Breaking

Friday, 27 February 2026

सांगोला नगरपरिषद हद्दीत एखतपूरोड भागाकरिता पाण्याची उंच नवीन टाकी बांधणे व पाणीपुरवठा करण्यासाठी रायझिंग मेन टाकणे ठराव जनरल मीटिंगमध्ये एकमताने मंजूर :

 


सांगोला/ प्रतिनिधी :  



 सांगोला शहरातील एखतपूर रोड परिसरात पाणीपुरवठ्याच्या सोयीसाठी नगरपरिषदेने 1998 साली  पाण्याची उंच टाकी बांधलेली आहे. या टाकीची क्षमता  2 लाख लिटर असून या टाकीतून पुजारवाडी, नविन वसाहत, मस्के कॉलनी, बापू झंझे वसाहत, बनकर वस्ती, धोंडीराम जाधववस्ती व धर्मा जाधववस्ती करीता पाणीपुरवठा करणेत येत आहे. सदर भागात नवीन वसाहतीचे प्रमाण वाढले आहे सदर भागातील  सध्या अस्तीत्वातील लोकसंख्येचा विचार करता नागरीकांना पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत व पाणी कमी प्रमाणात मिळत आहे. काही भाग पाण्यापासून वंचित आहे, याची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, पाणीपुरवठा सभापती सौ. वैशाली सतीश सावंत प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. सीमा समाधान सरगर तसेच नगरसेवक चैतन्य ज्ञानु राऊत  यांनी नगरपालिकेच्या जनरल मीटिंगमध्ये या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करून एखतपूर रोड भागाकरिता पाण्याची उंच नवीन टाकी बांधणे व टाकीस पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्याचा  ठराव मंजूर केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून सदर कामाचे अंदाजपत्रक व प्रस्ताव / ऊझठ तयार करून घेणे, कामाचा विषय मा. सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एखतपूर रोड परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.