सांगोला प्रतिनिधी -
अजनाळे येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या व्हा चेअरमनपदी शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष तसेच डॉ. अनिकेत देशमुख यांचे खंदे समर्थक नारायण पांडुरंग गुरव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करून जल्लोष साजरा केला.
यापूर्वी समाधान यादव यांनी व्हा चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. रिक्त पदासाठी नारायण गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. पुजारी यांनी त्यांची बिनविरोध निवड अधिकृतरीत्या घोषित केली.
नारायण गुरव हे सामाजिक व सहकार क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे, प्रा. हणमंत कोळवले, माजी चेअरमन हमुनाना येलपले, दत्तात्रय कोळवले, बाळासो लाडे, विठ्ठल कोळवले, चेअरमन नारायण पाटील, चंद्रकांत शेंबडे, अशोक कोळवले, उषा कोळवले, समाधान यादव, राणी येलपले, लक्ष्मण गुरव, सचिव सिताराम भडंगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. फोटो
शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष व डॉ अनिकेत देशमुख यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नुतन व्हा चेअरमन नारायण गुरव
