Breaking

Wednesday, 18 February 2026

कडलास आरोग्य उपकेंद्र लसीकरणापुरतेच, कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याने ग्रामस्थ त्रस्त

 

सांगोला प्रतिनिधी -




कडलास उपकेंद्रात अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर , आरोग्य सेवक नसल्याने नागरिकांचे हाल. 

आरोग्य उपकेंद्रे फक्त लसीकरणासाठी मर्यादित आरोग्य व्यवस्था रामभरोसे चालत आहे अशी स्थिती .

आरोग्य अधिकारी आपल्या मुख्यालयी राहणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना देखील तालुक्यातील कडलास आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. समुदाय आरोग्य अधिकारी प्रशांत बिराजदार 

 बाहेर गावाहून ये-जा करत असल्याने रात्री-अपरात्री रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी महिला आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कडलास गावातील सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे.