Breaking

Monday, 12 January 2026

सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन इंगोले तर स्वीकृत नगरसेवकपदी विजय इंगोले ?


शहर विकास आघाडीकडून गटनेते पदी रमेश जाधव तर स्वीकृतपदी तनुजा एरंडे ?

आज अधिकृत निवडी होणार

सांगोला/प्रतिनिधीः 





सांगोला नगरपरिषदेची उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडींची सभा आज मंगळवार दि. 13 रोजी सकाळी 11 वा. राजमाता पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित केली आहे. सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यपदी शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्र. 11 मधील नगरसेवक नितीन इंगोले यांचे नावे शिवसेनेचे नेेतेे मा.आ. अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी जाहीर केले आहे. तर स्वीकृत नगरसेवकपदी विजय इंगोले यांचे नाव निश्‍चित केले आहे.

शेतकरी कामगार पक्ष, दिपकआबा साळुंखे-पाटील गट व भारतीय जनता पक्षाच्या शहर विकास आघाडीकडून गटनेतेपदी प्रभाग क्र. 8 मधील इंजि.रमेश जाधव तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाच्या तनुजा बाळासाहेब एरंडे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. आज सकाळी 11 वा. नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सभागृहात निवडी होणार आहेत. या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे.