Breaking

Monday, 12 January 2026

तालुका क्रीडा संकुल येथे र दि.10 व 11 जानेवारी रोजी महसूल विभाग चषक 2026 क्रिकेट स्पर्धा संपन्न

 

या क्रिकेट सामन्यात महसूल विभागाने जिंकला महसूल चषक ; अखेर महसूल विभागाचा विजय

सांगोला/प्रतिनिधी: 





तालुका क्रीडा संकुल येथे शनिवार दि. 10 व रविवार दि11 जानेवारी रोजी महसूल विभागाच्या वतीने महसूल चषक 2026 दोन दिवशीय क्रिकेट सामने संपन्न झाले. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन सांगोला तालुक्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सांगोला पंचायत समिती, कृषी विभाग , महसूल विभाग, विद्यामंदिर परिवार, डॉक्टर्स असोसिएशन, एच.डी.एफ.सी बँक, सांगोला अर्बन बँक, इंडुसड बँक अशा एकूण 8 संघानी सहभाग नोंदवला.

4 संघाचा 1 गट अशा पद्धतीने 2 गटामध्ये सामने होऊन डॉक्टर्स असोसिएशन, पंचायत समिती, विद्यामंदिर परिवार व महसूल विभाग या 4 टीम सेमी फायनल मध्ये आल्या.

फायनल सामना विद्यामंदिर परिवार व महसूल विभाग यांच्यात झाला. महसूल विभागाने विद्यामंदिर परिवार या संघाचा 10 विकेट राखून पराभव केला. स्पर्धेचे आयोजन महेश जाधव, उमाकांत मोरे यांनी केले होते.

चौकट:

या क्रिकेट सामन्यात महसूल विभाग प्रथम, विद्यामंदिर परिवार द्वितीय, पंचायत समिती तृतीय, डॉक्टर्स असोसिएशन चतुर्थ क्रमांक पटकावला.

बेस्ट बॉलर म्हणून उमाकांत मोरे, बेस्ट बॅटसमन व मालिकावीर म्हणून विकास माने यांना गौरविण्यात आले.विजेत्या संघाना निवासी नायब तहसिलदार श्री. सोमनाथ साळुंखे, डॉ. अजळकर यांचे हस्ते चषक प्रदान करण्यात आले.