Breaking

Wednesday, 17 December 2025

आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत जवळा येथे शेतकरी कार्यशाळा उत्साहात संपन्न

 

सांगोला /प्रतिनिधी : 


जवळा ता. सांगोला येथे दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी  नारायण मंदिर परिसरात शेतकरी शेती शाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव  प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी सौ. दिपाली जाधव यांचे औक्षण करून स्वागत केले.

यानंतर सौ. जाधव  यांनी फार्म मेकॅनायझेशन योजनेअंतर्गत निवड झालेल्या अवजारांची तपासणी करून शेतकरी शेती शाळेची अधिकृत सुरुवात केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तंटामुक्त अध्यक्ष अरुणभाऊ घुले व विकास सेवा  सोसायटीचे विद्यमान चेअरमन  सुनीलआबा साळुंखे यांनी भूषविले.         

यावेळी सौ. जाधव  यांनी शेतकरी गटांचे महत्त्व, शेती शाळेची संकल्पना तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती शेतकर्‍यांना दिली.

कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी  पांडुरंग झोळ यांनी शेतकर्‍यांना औषध फवारणी किटचे वाटप करून त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथील डॉ. काजल जाधव यांनी मृद आरोग्य पत्रिकेचे महत्त्व व त्यावर आधारित खत व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.

यानंतर कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथील डॉ. विशाल वैरागकर यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी (ऋझज) यांची स्थापना, कार्यपद्धती तसेच त्यातून शेतकर्‍यांना मिळणारे आर्थिक व बाजारपेठेचे लाभ याबाबत मार्गदर्शन केले.

सहाय्यक कृषी अधिकारी प्रतीक डुबल यांनी शेतकर्‍यांना महाविस्तार प विषयी माहिती देत प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या मोबाईलमध्ये प डाऊनलोड करून घेतले व या पच्या माध्यमातून मिळणार्‍या विविध कृषी सेवांचे महत्त्व स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. उत्कर्ष चंदनशिवे यांनी केले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी जवळा, उपकृषी अधिकारी जवळा, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.