Breaking

Wednesday, 17 December 2025

फॅबटेक विद्यार्थ्यांकडून एक हजारांहून अधिक झाडांचे संगोपन व स्वच्छता

 

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत उपक्रम: प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे यांची माहिती

सांगोला/प्रतिनिधी : 



फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी वासुद (ता. सांगोला) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता हिच सेवा अभियान अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते या अभियानांतर्गत फॅबटेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक हजारांहून अधिक झांडाचे संगोपन व स्वच्छता केली असल्याची महिती प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.

या अभियानाचे उद्घाटन सांगोला पोलीस स्टेशनचे सोमनाथ बाड, अभियंता धनंजयसिंह केदार यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक विष्णुपंत केदार, संजयसिंह केदार, सुनिल खटके, कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत आदींसह वासुद ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यादरम्यान फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून वासुद गावातील एक हजारांहून अधिक वृक्षांचे संगोपन करून त्यांची स्वच्छता केली. हे अभियान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर व प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. ज्योती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत यांनी या अभियानांतर्गत करण्यात येणार्‍या कार्यक्रमाची माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

   हे अभियान यशस्वी करण्यासाठी  स्टुडंट डिन डॉ. संजय पवार, कार्यक्रम समन्वयक प्रा. राहूल पाटोळे, प्रा. अनघा येलपले, प्रा. अर्चना गुरव, प्रा. माणिक मोरे, प्रा. स्वप्निल पडवळे आदींसह महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.