सांगोला प्रतिनिधी -
27 वा क्रीडा महोत्सव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दि. 4 ते 8 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये सांगोला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुजाता बाबर हिने उंच उडी क्रीडा प्रकारांमध्ये 1.51 मीटर उंच उडी घेऊन गोल्ड मेडल मिळविले.
या यशाबदद्ल संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार व श्री प्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री. नागेश गुळमिरे, सचिव अॅड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी व महाविद्यालयातील या खेळाडूस मार्गदर्शन करणारे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व क्रीडा शिक्षक प्रा. जगदीश चेडे यांनी खेळाडूचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर खेळाडूस सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
