मुंबई :
रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी हायस्कूल येथील सहशिक्षक प्रमोद अरविंद डोंबे यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन 2026-2027 प्रदान करण्यात आली. हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाला.
हा सन्मान यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे, थोर शास्त्रज्ञ माननीय डॉ. अनिल काकोडकर, तसेच कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू सन्माननीय मगर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन या विषयावर नवोन्मेष, संशोधनात्मक दृष्टिकोन आणि गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही फेलोशिप प्रदान करण्यात आली असून, श्री.प्रमोद डोंबे यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने तसेच शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यासाठी रयत शिक्षण संस्थेचे, सहसचिव,श्री.पवार साहेब मध्य विभागाचे विभागीय अधिकारी श्री. जगदाळे साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.निकम साहेब व श्री. दाभाडे साहेब , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.उत्तम रायभान सर पर्यवेक्षक श्री.मासाळ सर व सर्व सेवक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
