Breaking

Friday, 26 December 2025

जयकुमार गोरे हिरो होते, आणि हिरोच राहणार



अ‍ॅड. सचिन देशमुख यांचा विरोधकांवर पलटवार

सांगोला : प्रतिनिधी 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या नगरपरिषद निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या आहेत. जिथे भाजपचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता तिथे भाजपने लक्षणीय विजय संपादन केला आहे. जिल्ह्यात 131 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे लोकांनी भाजपला नाकारले असे म्हणता येणार नाही.  या निकालावरून लोकांनी भाजपचं उत्साहात स्वागत केलं असल्याचच दिसत आहे. त्यामुळे मा. जयकुमार गोरे यांना खलनायक ठरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे मत भाजपचे नेते अ‍ॅड. सचिन देशमुख यांनी व्यक्त केले. 

बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, अनगर या चार नगरपरिषदांवर भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला आहे. भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात आणि सांगोला शहरातही विकासाच्या मुद्द्याला धरून निवडणूक लढवली. सांगोला शहरातही सांगोला शहर विकास आघाडीच्या काही उमेदवारांचा अल्पमताने पराभव झाला आहे. भाजपमुळे हा पराभव झाला किंवा भाजपला लोकांनी नाकारले असे काही जणांना वाटत आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पहिल्याच निवडणुकीत पालकमंत्री म्हणून जयकुमार भाऊंनी विकासाच्या जोरावर मूळ भाजप कार्यकर्त्यासोबत नवीन कार्यकर्ते उभा करून त्यांच्यावर भाजप आणि राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जयाभाऊंवर  जी जबाबदारी दिली होती त्यासाठी त्यांनी यंत्रणा उभी केली आणि त्यांनी 12 पैकी 12 जागांवर कमळ चिन्हावर नगराध्यक्ष उमेदवार उभे केले पण हे उमेदवार उभे करताना स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊन उभे केले त्यांनी कुठे ही उमेदवार लादले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर जो दादागिरीचा आरोप केला जातोय हा पूर्णपणे चुकीचा आहे , गेल्या निवडणुकीत म्हणजे 2016 मध्ये भाजपचे फक्त 2 नगराध्यक्ष निवडून आले होते, आज ती संख्या 4 आहे. 2016 च्या तुलनेत भाजपने या निवडणुकीत मोठी आणि रेकॉर्डब्रेक झेप घेतली आहे, 2016 साली केवळ 31 नगरसेवकांवरून आज थेट भाजपाने चिन्हावर 131 नगरसेवकांचा आकडा गाठला आहे. काही अपक्ष नगरसेवक अजून सोबत आहेत. आज 12 पैकी 7 नगरपरिषदांवर भाजपची सत्ता आली आहे, काही नगराध्यक्ष थोडक्या मतांनी पराभूत झाले मात्र भाजपाने करुन दाखवले आहे. या ऐतिहासिक यशाच्या मागे एक हात आहे तो म्हणजे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे !

प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देणारा, कार्यकर्त्यांना न्याय देत पार्टी उभी राहिली पाहिजे म्हणून सर्वोतोपरी मदत देणारा हा माणूस अख्ख्या निवडणुकीत जिल्ह्यात तळ ठोकून होता. परक्या जिल्ह्यातून येऊन इथं पार्टी उभी करण्यासाठी साम दाम दंड भेद सगळी ताकद कार्यकर्त्यांच्या मागे लावणारा जयाभाऊंसारखा दिलदार नेता आज कुणी पाहिला नाही.

काल जयाभाऊ बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले, माझ्यावर कितीही टीका आणि आरोप होऊ द्या, मी खंबीर आहे पण पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही. कायम सोबत आहे. हे उर्जा देणारे वाक्य त्यांच्या पक्षनिष्ठा आणि समर्पणाचे एक देखणं उदाहरण आहे.

आज निवडून आलेला नगरसेवकांचा 131 चा आकडा उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांना बळ देणारा आणि भविष्यात होणार्‍या विधानपरिषद निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरणार आहे,

सांगोला नगरपरिषदेत  या वेळेस प्रथमच भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. पालकमंत्री जया  गोरे यांनी विकासाचे मांडलेले व्हीजन लोकांच्या पसंतीस उतरल आहे. प्रचाराच्या अनुषंगाने सांगोला शहर विकास आघाडी कडून काही उनिवा  राहिल्या आणि  या उलट शहाजी बापू लोकांची सहनभूती मिळविण्यात यशस्वी झाले त्यामुळे एका अर्थाने पराभवालाच सामोर जावं लागलं आहे. झालेला पराभव आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून मान्य आहे. मात्र प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, तिथले प्रश्‍न, लोकांची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे या निवडणुकीचा इतर निवडणुकांवर परिणाम होईल असे वाटत नाही. भाजपने देशासह राज्यात विकासात्मक वातावरण तयार केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात विकासाचे वातावरण तयार झाले आहे. सांगोला शहराच्या बाबतीत हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विकासासाठी केलेली  मदत  हे निवडणुकीत प्रभाविपणे प्राचारात मांडता आली नाही आणि मित्र पक्षांनी पण ती निवडणुकीमुळे नाकारली असे असले तरी जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आगामी काळात सांगोला शहराच्या विकासाला नक्कीच हातभार लावला जाईल. सत्ताही येत जात असते मात्र त्यामुळे शहराचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबला नाही पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना असते. ही लोक भावना ओळखून आगामी काळात सांगोला शहराच्या विकासात पालकमंत्री जयकुमार गोरे नक्की हातभार लावतील हा विश्‍वास आहे. 

पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन  मंडळाच्या विकास निधीतून  सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी दिला आहे. यामध्ये आमदार डॉ बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, बाळासाहेब एरंडे मालक,चेतनसिंह केदार मालक यांना त्यान्च्या मागणीवरून निधी दिला  आणि या माध्यमातून   अनेक गावात  मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली आहेत आणि जायभाऊंनी अतिवृष्टी झाली त्यावेळी आजारी असतानासुधा सलाईन लावलेला हात घेऊन जी मदत केली, आधार दिला तो अविस्मरणीय होता  सांगोल्यातील अनेक महत्त्वपूर्ण विकासकामाबाबत सांगोला भाजपच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आणि आगामी काळात ही असा भरघोस निधी पालकमंत्री जयकुमार गोरे हे देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. सहज उपलब्ध होणारा, सुटाबूटात  थाट न करणारा,मोठेपणा न गाजवणारा, सामान्य, गरीब, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, बाराबलुतेदार, उद्योजक, नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रशासन यांना सोबत घेऊन विकासासाठी आणि समाजासाठी, या राज्याच्या विकासासाठी पूर्णवेळ  वाहून घेतलेला हा माझा नेता आहे आणि त्त्यांचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आणि गर्व आहे त्याचमुळे जयकुमार गोरे हे आमच्यासाठी काल ही हिरोच होते आणि भविष्यात ही हिरोच राहतील अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. सचिन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.