Breaking

Friday, 26 December 2025

कोळा जिल्हा परिषद गटात युवा नेतृत्वाला संधी द्या - उद्योगपती अ‍ॅड विशाल देशमुख ः

 

 आ बाबासाहेब देशमुख यांच्याकडे मागणी 

सांगोला प्रतिनिधी 



सांगोला तालुक्यात नगरपालिका निवडणुकांचा धुरळा शांत होतोच तोपर्यंत लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे शक्यता असल्याने कोळा जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य साठी निवडणुकीची कार्यकर्त्यांची रंगीत तालीम सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे युवकांना तरुणांना नेतृत्वाची संधी मिळावी, अशी मागणी कोळा गावचे उद्योगपती अ‍ॅड विशाल दिलीप देशमुख यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडे भेटून प्रत्यक्ष मागणी केली आहे. त्यांच्यासमवेत अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे बोलताना सांगोला सूतगिरणीचे संचालक दिलीपराव देशमुख यांचे चिरंजीव उद्योगपती अ‍ॅड विशाल दिलीप देशमुख आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी इच्छुक मी स्वतः या निवडणुकीसाठी इच्छुक असून, आमदार साहेबांनी नव्या दमाच्या, सुशिक्षित युवकांना संधी द्यावी असे मत आहे ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केलेले तरुण नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे गुजरात अशा शहरांकडे स्थलांतर करत आहेत. परिणामी गावांत कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. शेती, लघुउद्योग, हस्तकला, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांत स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध असूनही त्याकडे आवश्यक या गोष्टीकडे मला प्राधान्याने लक्ष द्यायचे आहे असे ड विशाल देशमुख यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या सोबत सुहास माने, पृथ्वीराज सरगर, हिम्मत माळी, आकाश आलदर, सुनील मदने, युवा नेते दत्ता सरगर, (चक्रीवादळ) अशोक सरगर, समाधान सरगर, समाधान माळी व प्रथमेश सरगर शुभम आलदर मुरली आलदर प्रथमेश व्हणमाने अजित माळी तानाजी सरगर अण्णा आलदर अजित सरगर अभिजीत पाटील युवराज माळी पै. प्रकाश देशमुख स्वप्नील गडदे पृथ्वीराज आलदरउपस्थित होते. युवक, शेतकरी व स्थानिक विकासासाठी ठोस काम करण्याची तयारी असल्याचेही युवकांनी स्पष्ट केले.