Breaking

Saturday, 20 December 2025

बलवडी जि.प. प्रा. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षपदी प्रमोद शिंदे तर उपाध्यक्षपदी शाहीन शेख यांची निवड..

 


सांगोला प्रतिनिधी -


जि.प. प्रा. शाळा बलवडी ता. सांगोला येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी शाहीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्‍वर राऊत हे होते. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

 सदर प्रसंगी मा. सरपंच बाळासाहेब शिंदे, मा.शा. समिती अध्यक्ष बाळासो खुळपे, मा. उपाध्यक्ष चांगदेव शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे, मा. उपसरपंच रविराज शिंदे, उपसरपंच शिवाजी शिंदे, ग्राम. सदस्य बाबासाहेब पालसांडे या सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी केले. यावेळी इतर सदस्य यामध्ये बाबासो पालसांडे, मा. शिक्षक चंद्रकांत यादव, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्वाती पाटील, दादासो शिंदे, प्रमोद शिंदे, गणेश पवार, कैलास करडे, सौ. गौरी शिंदे, सौ अश्‍विनी महामुनी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी मुख्याध्यापक मनोहर पवार यांची निवड एकमताने करण्यात आली. निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार शिक्षक चतुरगुण अवताडे यांनी सर्वांचे आभार मानले.