Breaking

Saturday, 20 December 2025

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान :जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतीतून स्वच्छतेचा संदेश

 


सांगोला/प्रतिनिधी ः 



संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळा मुले व मुली या शाळेतील विद्यार्थी देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी गावचा मुख्य रस्ता व शाळा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. स्वच्छता म्हणजेच सेवा हा संदेश देत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहाने स्वच्छता अभियान राबविले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा गोळा केला, प्लास्टिक वेगळे करून योग्य ठिकाणी टाकले तसेच शाळेच्या परिसरातील झाडाझुडपे स्वच्छ केली. संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता विचारांची ओळख विद्यार्थ्यांना करून देत स्वच्छतेचे धडे देण्यात आले. स्वच्छ गाव, निरोगी जीवन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामुळे गावकर्‍यांमध्येही स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सामाजिक भान, जबाबदारी व नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते, असे मत शिक्षण तज्ञ एडवोकेट श्री निलेश मदने सर यांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा यांच्या विचारांना अनुसरून स्वच्छता ही दैनंदिन सवय व्हावी, असा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कोळा गावचे माजी डेप्युटी उत्तम तात्या आलदर घेरडे साहेब ्येष्ठ नेते रफिक तांबोळी,चेरमन तुकाराम तात्या कोळेकर , विठ्ठल कोळेकर, दत्तात्रय माने,कोळे मुली शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री राहुल वाले कोळेमुले शाळेचे व्यवस्थापन अध्यक्ष श्री अंबादास सरगर, श्री उत्तम बोबडे ,शंकर तोडकर, पोलीस पाटील मदन आलदर,पै.प्रकाश सरगर, कोळे ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते. केंद्र प्रमुख श्री ज्ञानदेव कोळेकर सर,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय भाले सर श्रीकोळी मुले शाळेचे मुख्याध्यापक अशोक तंडे सर,शिक्षक वाघमोडे सर,गुळीक सर,पटेल मॅडम अदलिंग मॅडम, श्री साईनाथ नाईनवाड यांनी मेहनत घेतली.