सांगोला /प्रतिनिधी:
चोपडी येथे शेतकर्यांच्या हितासाठी डाळिंब फळपिकांवर ड्रोनद्वारे फवारणीचे सखोल व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केशरमाती उद्योगाचे सर्वेसर्वा सतीश पाटील यांच्या डाळींब बागेत यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रात्यक्षिकामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कमी वेळेत, कमी खर्चात व अचूक प्रमाणात फवारणी कशी करता येते याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ड्रोन फवारणीमुळे मजुरी व वेळेची मोठी बचत होते. फवारणीची एकसमानता व अचूकता येते.औषधांचा योग्य वापर व अपव्यय कमी होतो. शेतकर्यांच्या आरोग्याचा धोका टाळता येतो.मोठ्या क्षेत्रावर कमी वेळेत फवारणी करणे शक्य होते .
या प्रात्यक्षिकावेळी उपस्थित शेतकर्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता व प्रत्यक्ष फवारणी पाहून समाधान व्यक्त केले. भविष्यात फळपिकांमध्ये
उत्पादनवाढीसाठी व खर्च कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रात्यक्षिकास सहाय्यक कृषी अधिकारी,चोपडी एस.डी. गवळी, कृषीमित्र बाळासाहेब बाबर व डाळींब फळपीक उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
डाळिंब शेतीला ड्रोनच्या साह्याने स्प्रे करण्याचे प्रात्यक्षिक सतीश पाटील यांच्या केशरमाती फॉर्ममध्ये घेण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी.एस.डी. गवळी, प्रगतशील शेतकरी श्रीमंत शिंदे, अण्णा गडदे , गुलाब बाबर, मेजर अमोल बाबर, सुभाष बाबर, प्रतीक बाबर , आकाश यादव, अंकुश खळगे , पोपट बाबर , संतोष बाबर , ज्ञानेश्वर पाटील व डाळिंब मार्गदर्शक विनायक बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
