Breaking

Thursday, 18 December 2025

सांगोला येथे 14 वर्षांखालील कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

 


सांगोला / प्रतिनिधी :



क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्या वतीने आयोजित क्रीडा सप्ताह सन 2025-26 अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत 12 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धा दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी तालुका क्रीडा संकुल, सांगोला येथे यशस्वीरीत्या पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये 14 वर्षांखालील मुले व मुली गटातील सांगोला तालुक्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सिंहगड पब्लिक स्कूल, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल, सह्याद्री प्राथमिक विद्यालय, उत्कर्ष प्रशाला आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वजनगटांनुसार आपले कौशल्य सादर केले.

मुले :

20-25 किलो : श्रीहरी देशपांडे (विद्यामंदिर प्रशाला)

25-30 किलो : लोकेश गेजगे (न्यू इंग्लिश स्कूल), असद खतीब (सह्याद्री प्राथमिक), दिव्यांक खोत (सिंहगड पब्लिक)

30-35 किलो : गुरुराज पांढरे (सह्याद्री प्राथमिक), प्रयाग पवार (सह्याद्री इंग्लिश), मोसिन पठाण (सह्याद्री प्राथमिक)

35-40 किलो : अथर्व बंडगर (न्यू इंग्लिश), सार्थक गडदे (विद्यामंदिर इंग्लिश), दिग्विजय जावीर (विद्यामंदिर प्रशाला)40-45 किलो : हर्षवर्धन हाके (विद्यामंदिर प्रशाला), विघ्नेश ठोंबरे (न्यू इंग्लिश), प्रत्युष सावंत (उत्कर्ष)45-50 किलो : शिवराज कळसुले (विद्यामंदिर प्रशाला), पार्थ खरात (सिंहगड पब्लिक), समर्थ बंडगर (न्यू इंग्लिश)50-55 किलो : रेहान इनामदार60 किलोवरील : अभयसिंह ऐवळे (सिंहगड पब्लिक), शिवतेज इंगोले (विद्यामंदिर प्रशाला)

मुली :

26-30 किलो : परिणीती माने (विद्यामंदिर प्रशाला)

30-34 किलो : परिणीती नलवडे (उत्कर्ष)

34-38 किलो : सिमरन शिनगारे (विद्यामंदिर प्रशाला), श्‍वेता मोरे (सह्याद्री इंग्लिश)38-42 किलो : श्‍वेताली सावंत (उत्कर्ष), सना तांबोळी (विद्यामंदिर प्रशाला), शरयू भुसे (सह्याद्री इंग्लिश)42-46 किलो : संजोगी रणदिवे (सह्याद्री प्राथमिक), तेजस्विनी खोत (सिंहगड पब्लिक)

46-50 किलो : राजलक्ष्मी वाघ50 किलोवरील : आरोही सावंत (विद्यामंदिर इंग्लिश), ईश्‍वरी चव्हाण व संस्कृती झिंगळे (सह्याद्री इंग्लिश)या स्पर्धा राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी मान्यताप्राप्त घखज पंचांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे माजी विद्यार्थी अ‍ॅड. साहिल सय्यद यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईल व ऑनलाइन गेम्सपासून दूर राहून कराटेसारख्या खेळांकडे लक्ष केंद्रित करावे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे असे आवाहन केले.

स्पर्धेसाठी कराटेचे जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे सर, सुनील वाघमारे सर, श्रावणी वाघमारे, विजेंद्र चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच स्वप्नील चाचणी, सुभाष निंबाळकर, अमोल इमडे, धीरज पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडल्या.