सांगोला/प्रतिनिधी ः
होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना सांगोला तालुका दिनांक 16-11-2025रोजी नूतन अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत (माजी मुख्याध्यापक) मानाप्पा भडंगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना सांगोला तालुक्याची नवीन कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे उपाध्यक्ष विजय ऐवळे (चिंचोली) यांनी भूषविले. यावेळी ह .भ .प .केशव हेगडे, विजय ऐवळे ,उमेश केंगार ,बिरू भंडगे, नवनाथ भंडगे, सिद्धू भंडगे, कुंडलिक भंडगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. होलार समाज सामाजिक पुरोगामी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चरण (दादा) भडंगे यांचे अचानक जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली ही पोकळी भरून काढण्यासाठी व तसेच संघटनेचे कार्य पुढे अविरतपणे चालू ठेवण्यासाठी या संघटनेच्या सर्व तालुका कार्यकारणी, नियोजन समिती व महिला समिती या सर्वांच्या एकमताने आणि आग्रहाने (माजी मुख्याध्यापक) मानप्पा भडंगे गुरुजी यांची नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये सांगोला तालुका अध्यक्षपदी (माजी मुख्याध्यापक) मानाप्पा भडंगे, उपाध्यक्ष विजय ऐवळे, उपाध्यक्ष शिवाजी भडंगे, कार्याध्यक्षपदी कुंडलिक भंडगे सचिव उमेश केंगार, सह-सचिव ह. भ .प. केशव हेगडे, खजिनदार दाजी केंगार, ज्ञानेश्वर केंगार सह-खजिनदार, सिद्धू भंडगे संपर्कप्रमुख, आप्पा ऐवळे प्रसिद्धीप्रमुख, जनार्दन ऐवळे संघटक, नवनाथ भंडगे सह-संघटक, (माजी सरपंच) अशोक भडंगे प्रमुख मार्गदर्शक, नामदेव करडे विशेष मार्गदर्शक, नागनाथ ऐवळे तालुका संघटना संरक्षण पद, शंकर पारसे महिम गट प्रमुख, मच्छिंद्र केंगार पीएसआय विशेष सल्लागार. नियोजन समिती - अर्जुन भडंगे, शुभम गेजगे, बापू गेजगे, निरंजन केंगार, विश्वास भोसले, बाबासाहेब ऐवळे ,महेश ऐवळे ,रामा केंगार, तानाजी पारसे, मधुकर गेजगे सर, कैलास भंडगे.
महिला समिती ः राजाबाई भडंगे, रतन भंडगे, ताई केंगार, शिवानी जावीर, लतिका ऐवळे, भाग्यश्री ऐवळे, मनीषा केंगार, सुनीता जावीर, सविता केंगार, शालन भंडगे, उषा भंडगे, अनुसया हातेकर, विमल भडंगे, सुषमा गेजगे, सीमा भोसले व समाज बांधव उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. भ. प. केशव हेगडे महाराज यांनी केले व आभार प्रदर्शन नवनाथ भंडगे यांनी मानले.
