मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध व निर्दोष पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज
सांगोला / प्रतिनिधी -
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदान दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिले मार्गदर्शन व प्रशिक्षण आज, दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडले.
अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित या प्रशिक्षणात मतदान केंद्रावर कर्तव्य बजावताना आवश्यक असणार्या नियमावली, आचारसंहिता, मतदान केंद्र व्यवस्थापन, सुरक्षा, तसेच एतच (एश्रशलीीेंपळल तेींळपस चरलहळपश) आणि ततझअढ मशिन्स हाताळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणात तहसील कार्यालय सांगोला येथील समाधान वाघमोडे यांनी अधिकार्यांना मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती देत मतदान केंद्रावर शिस्त, पारदर्शकता व कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. एतच् मशिन्सचे प्रात्यक्षिक देत संभाव्य तांत्रिक अडचणींचे समाधान कसे करावे याचीही माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणास मा. निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी उपस्थित राहून निवडणूक ही लोकशाहीचा आत्मा असून मतदान प्रक्रिया निर्दोष, निष्पक्ष आणि शांततेत पार पडणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी डॉ. सुधीर गवळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला, सोमनाथ साळुंखे, नायब तहसीलदार, तसेच सचिन पाडे, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आगामी निवडणुकीत सांगोल्यातील मतदान प्रक्रिया सुयोग्यपणे, सुरक्षित आणि लोकशाही मूल्यात पार पडण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे चित्र या प्रशिक्षणातून दिसून आले.
