सांगोला/प्रतिनिधी ः
सांगोला पंचायत समितीचे पहिले सभापती, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या 29 व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दि. 19 नोव्हेंबर 2025 ते मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मेडशिंगी ता.सांगोलायेथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे बहुउद्देशीय स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड,उपाध्यक्ष श्री.अरुणभाऊ शेंडे,सचिव मा.डॉ.कृष्णा इंगोले व देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयाच्या प्राचार्या एन.एस.पारेकर यांनी दिली.
बुधवार दि.19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता मेडशिंगी विद्यालय येथे पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन पोलीस अधिक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.समितदादा कदम(प्रदेशाध्यक्ष, जनस्वराज्य पक्ष) तसेच पोलीस निरीक्षक मा.श्री.विनोद घुगे साहेब यांची उपस्थिती असणार आहे.
शुक्रवार दि.21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता मेडशिंगी विद्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असून सांगोला येथील रेवनील ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन साळे हॉस्पिटल सांगोलाचे डॉ. प्रसाद साळे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
शनिवार दि.22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मेडशिंगी विद्यालयच्या भव्य प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयातील विद्यार्थ्यांसह विश्वशोभाराणी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सौ.व श्री.ड.अंबरीष खोले साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सोमवार दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मेडशिंगी येथे 12.5 कि.मी.पुरुष खुली अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेचे उदघाटन सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवार दि.25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मेडशिंगी विद्यालयाच्या प्रांगणात स्मृतीदिन पारितोषिक वितरण व सांगता समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड हे भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक मा.प्रा.डॉ.राजेंद्र दास उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास मा.श्री.समितदादा कदम(प्रदेशाध्यक्ष, जनस्वराज्य पक्ष),मा.श्री.अतुल कुलकर्णी(पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) तसेच मा.श्री.राजेश पाटील वाठारकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमास व स्पर्धेस संस्थांतर्गत असणार्या सर्व प्रशालेतील आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक,शिक्षण प्रेमी नागरिकांनी त्याचप्रमाणे मेडशिंगी व परिसरातील सर्व ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे बहुउद्देशीय समितीने व संयोजकांनी केले आहे.
