Breaking

Monday, 10 November 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार : खासदार धैर्यशील मोहिते -पाटील

 

*खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न



सांगोला/ प्रतिनिधी:

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुका मोठ्या क्षमतेने पार पाडाव्यात. उमेदवारांना सर्वतोपरी सहकार्य करू व त्यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करून भरघोस मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे प्रयत्न करुया. सांगोला येथे समविचारी पक्षांच्या विचार विनिमय बैठकीसाठी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकार्‍यांनी मोठ्या ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जावे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. नगरपालिका निवडणूकी साठी समविचारी पक्षातील जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊया. कोणाशी युती करायची असेल तर युती करूया व शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवूया . कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घ्यावा त्यास आम्ही समर्थपणे साथ देऊ. कार्यकर्त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकद उभा करून नगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा ठाम निर्धार  खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोला येथे कार्यकर्त्या संवाद  मेळाव्यामध्ये व्यक्त केला.

सांगोला येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी संपन्न झाला. यावेळी साहेबराव ढेकळे, शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते सूर्यकांत घाडगे, अरुण तोडकर, महेश नलवडे, विनंतीताई कुलकर्णी, सुनंदाताई पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब ,पदाधिकारी, एआय एम आय एम पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

          यावेळी ज्येष्ठनेते बाबुरावजी गायकवाड, वसंतनाना देशमुख, रवींद्र पाटील, अरुण तोडकर,  तुषार इंगळे, पत्रकार मिनाज खतीब, दत्तात्रय टापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय सावंत , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भारतनाना गवळी. स्वराज्य पक्षाचे विशाल केदार ,परमेश्‍वर गेजगे शौकतभाई खतीब म्हणाले , सांगोला तालुक्याच्या दृष्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता आमचे मार्गदर्शक व आधारवड म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नगरपालिका निवडणुकीत शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लावू. तालुक्यातील मातब्बर पक्षाच्या नेते मंडळींना सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील कार्यकर्त्यांनी समविचारी पक्षाशी युती करण्यासाठी तयारी ठेवली असून ही निवडणूक जनता हातात घेणार आहे .कार्यकर्त्यांनी, मतदारांनी योग्य तो उमेदवार आपल्या प्रभागातून द्यावा 

नगरपालिका निवडणुकीत  सर्व समाजातील उमेदवारांना संधी दिली जाईल. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समर्थपणे पार पाडव्यात. नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यांनी विजय संपादन करूया असा निर्धार मान्यवरांनी कार्यकर्त्या संवाद मिळाव्यात व्यक्त केला.

नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांनी आपापल्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. कोण कोणाशी युती करणार हे अद्याप निश्‍चित झाले नसून गुप्त बैठका सुरू आहेत. शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरपालिका निवडणुकीसाठी  इच्छुक असणाऱे उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार यांनी प्रभाग निहाय यादी तयार करावी. नगरपालिका निवडणुकीसाठी तरुण उमेदवारांची संख्या मोठी आहे. महिलांना 50 टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपली नावे  प्रमुखाकडे द्यावीत. सक्षम कार्यकर्त्याची उमेदवारीसाठी निवड केली जाईल: 

बाबुरावजी गायकवाड,

शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते


फोटो धैर्यशील माहिते-पाटील