Breaking

Tuesday, 11 November 2025

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उबाठा मध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुलाखतीद्वारे उमेदवार निवडण्याचा ऐतिहासिक निर्णय

 



सांगोला/प्रतिनिधी ः 



सूत्राच्या माहितीनुसार असे समजते की राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यात होणार्‍या स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत शिवसेना  उबाठा पक्ष राज्यात अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात असताना सोलापूर जिल्ह्यत मात्र उमेदवार निवडीतील  घोडेबाजार रोखण्यासाठी  आणि उमेदवार निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी पक्ष प्रमुखांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उपनेते शरद कोळी, महिला उपनेत्या सौ. अस्मिता गायकवाड, शिवसेना पक्ष संघटक उद्धव कदम आणि जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या या सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून  पुरुष आणि महिला जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय इच्छुकांच्या निस्पक्ष मुलाखतीद्वारे 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेनंबरला  सोलापूर मध्ये उमेदवार निवड होणार असल्याचे समजते.निवडणुकीमध्ये जिल्हानिहाय होणारी विविध समविचारी पक्षाशी युती किंवा आघाडी करताना किंवा एकला चालो रे चा नारा देताना निवडणूक समितीची सहमती घ्यावी लागणार असल्याचे समजते.सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पुरुष आणि महिला जिल्हा संमितीच्या उपस्थितीत  पक्षाने नियुक्त केलेल्या जिल्हा निवडणूक समितीच्या माध्यमातून मुलाखतीद्वारे उमेदवार निवड होणार असल्याने कांहीचे मात्र धाबे दनाणले असले तरी या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वसामान्य शिवसैनिकांकडून कौतुक होत असून या निर्णयचे सर्वत्र स्वागत होत आहे. पक्ष कार्याला योग्य दिशा देणार्‍या या पक्ष हिताच्या या निर्णयचे संपूर्ण श्रेय शिवसेना जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे असल्याने शिवसैनिकांकडून त्यांचे कौतुक होत असल्याचे समजते. यामुळे योग्य आणि निष्ठावंत उमेदवाराला न्याय मिळेल या आशेने निष्ठावंत शिवसैनिकात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होत असल्याचे समजते.सर्व जिल्हा प्रमुखांना वरिष्ठकडून तसें आदेश आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पक्ष प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयात व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करणारावर पक्षातर्फे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. कांहीही असो सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उबाठासाठी मात्र हा ऐतिहासिक निर्णय ठरणार हे नक्की.