Breaking

Tuesday, 11 November 2025

कोळा ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसरपंच उपसरपंचपदी स्वाती काटे यांची बिनविरोध निवड

 


कोळा :-


कोळा ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान मिळाला असून कोळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती विनोद काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.स्वाती काटे यांची बिनविरोध निवड होताच ग्रामस्थांनी आनंदोस्तव साजरा केला. कोळा ग्रामपंचायतीचेउपसरपंच शिवाजी हातेकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानेरिक्त झालेल्या उपसरपंच पदी स्वाती विनोद काटे यांना सर्व पक्षीय सदस्यांनी पाठींबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.आर.मोहिते यांनी काम पाहिले.कोळा ग्रामपंचायतीच्या इतिहासात ग्रामपंचायतीनेपहिल्यांदाच महिलासदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान देवूनमहिलासक्षमीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाउल टाकल्याचे  दिसून येत आहे. मा. जि.प. सदस्य ड. सचिन देशमुख यांनी स्वाती काटे यांना आपल्या गटातून उमेदवारी दिली होती. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंचस्वाती काटे व मावळते उपसरपंच शिवाजी हातेकर यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळीड. सचिन देशमुख यांनीआपल्या मनोगतामधून सांगितले कि,कोळा गावच्या सरपंच व उपसरपंच पदी समाजातील सर्व घटकातील सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा. सभापती संभाजी तात्या आलदर, जेष्ठ नेते तुकाराम (दादा) आलदर, मा. ग्रा.प. सदस्य बिरा आलदर, ग्रा.प. सदस्य दिलीप कोळेकर, माणिक आलदर यांच्यासह सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळेच हे  शक्य झाले.यापाचवर्षांच्या काळात कोळा ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी पक्ष पार्टी न बघता गावाच्या विकासाला प्राधान्य देवून गावाचा विकास केला असून एवढ्या मोठ्या गावात आपल्या सर्वांच्या मदतीने सर्व समाज घटकाला न्याय मिळवून दिला हि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याचात्यांनी शेवटी सांगितले. यावेळी शिवाजी कोळेकर व मारुती सरगर सर यांनी आपल्यामनोगतामधून नवनियुक्त उपसरपंच स्वाती काटे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळीजेष्ठ नेते तुकाराम (दादा) आलदर, कोळा गावच्या प्रथम नागरिक सरपंच कविता आलदर, मा. पं. स. सदस्यसिताराम सरगर,मा. सरपंच शहाजी हातेकर,ग्रा.पं. सदस्यडॉ. सादिक पटेल, सुरवंता पाटील, कुसुम गोडसे, शोभा करांडे, राजेंद्र देशमुख,संभाजी गोडसे, पै. हरिभाऊ सरगर, पै.दादा कोळेकर, राजू आलदरमुकादम, मारुती सरगर सर, ईश्‍वर सरगर, जालिंदर आलदर,विजय आलदर पंच,सुभाष केंगार, उद्धव करांडे, लिंगा हातेकर सर,अझरूद्दीन खाटिक, संदीप पाटील, विनोद काटे, प्रकाश करांडे, हरी आलदर, अस्लम पटेल, सतिश काटे, दादा कोळेकर, दादा मोटे,तुषार माने,भिमराव काटे, श्रीकांत मोरे, राजू काटे, रघुनाथ मोरे, विकास काटे, धनंजय काटे,रोहितनडोने, शरद माने, मंगेश काटेयांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.