सांगोला/प्रतिनिधी ः
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभावीपणे सुरू असलेले महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज विभागाकडून. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. यामध्ये अनेक गावे स्पर्धेमध्ये उतरले असून आपले गाव स्वच्छ .हरित .जलयुक्त आणि निरोगी करण्यासाठी गावागावांमध्ये चुरस लागली आहे अनेक गावांमध्ये पायाभूत सुविधा स्वच्छता अभियान. नदी स्वच्छ करणे .वृक्षारोपण रस्ते विकास पिण्याच्या पाण्याची सुविधा आरोग्य शिबिरे आपला गाव आपला विकास माध्यमातून आपले गाव सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करताना लोक चळवळीतून दिसत आहे. लोकवर्गणीच्या रूपाने विविध विकास कामे याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री मा.ना.जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या संकल्पनेतून गावाच्या सर्व विभागातून गावाचा विकासात्मक कायापालट होण्यासाठी हे अभियान सर्वांनी मनावर घेऊन मोठ्या प्रगतीपथावर काम करताना दिसत आहे .यामध्ये पंचायत राज विभागातून दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुली साठी विशेष कर संकलन दिन साजरा केला गेला. यामध्ये राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले .त्यासाठी प्रशासनाने त्या सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद विभागाकडून कौतुकाची थाप म्हणून प्रशस्तीपत्र देऊन या ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले. या कर संकलन होत असताना पारेगावचे मा.सरपंच संतोष पाटील हे सातत्याने या अभियानामध्ये स्वतः उतरून आपल्या गावाचे काम करताना दिसत आहेत. त्यांनी राज्याचे पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे मागील महिन्यातच ग्रामपंचायत कडून निवासी व अन्य थकित कर नागरिकाकडून घेत असताना आपण राज्यामध्ये होणार्या अतिवृष्टीमुळे बळीराजा डपगाहीला आला आहे व शेतकर्याकडे कर भरण्यासाठी आर्थिक परिस्थिती राहिली नाही या सर्व गोष्टीचा राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री महोदय त्यांनी विचार करून ग्रामपंचायत थकीतकर भरणा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीमध्ये भरणार्या साठी आपण शासन स्तरावरून 50% सवलत द्यावी .अशी मागणी आपल्या निवेदनाद्वारे सांगोल्याचे मा.आ. दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्याच अनुषंगाने आज मंत्रिमंडळाची बैठक होऊन यामध्ये पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागाच्या व्यथा लक्षात घेऊन .आज ग्रामपंचायत कडून निवासी व अन्य थकित कर 1एप्रिल 2025 अखेरपर्यंत असलेल्या नागरिकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश पारित केलेला आहे त्यामुळे या मागणीला मोठे यश आले आहे यासाठी संतोष पाटील यांचे राज्यातील सर्व ग्रामपंचायतिने आभार मानले आहे. भविष्यात येणार्या नागरिकांच्या प्रश्नावर आपण कायम वाचा बोलण्याची काम करू व पालकमंत्री महोदय यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडून आलेल्या मागणीचा गांभीर्याने विचार केला व त्यावरती एक मोठा निर्णय राज्यामध्ये घेण्यात आला त्यासाठी प्रथम मंत्री महोदयचं मी व संपूर्ण राज्य मनापासून अभिनंदन करत आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सांगोला नगरीशी बोलताना दिली.
