Breaking

Tuesday, 11 November 2025

 *सोलापूरचे किरण जोशी आणि दुर्गा जोशी कराड येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

विशेष /प्रतिनिधी -


९ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या  गौरवगाथा सन्मान सोहळ्यात भारत सरकारच्या अभियाना अंतर्गत विविध शैक्षणिक क्षेत्रात लेखनीय कार्य  करणाऱ्या, राष्ट्र उभारणीसाठी शैक्षणिक परिवर्तनाचा महामेरु  रचणाऱ्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कराड येथे सन्मान करण्यात आला. कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सोलापूरचे किरण जोशी यांना राज्यस्तरीय शिवराजमुद्रा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  शैक्षणिक, कला व नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल किरण जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी प्रा . सौ दुर्गा जोशी यांना संस्कृत अध्यापनक्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून, बालवर्गापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेतून , प्रयोगशील अध्यापनातून उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल , त्यांच्या अध्यापन कार्याची  दखल घेऊन राज्यस्तरीय  संस्कृत अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार स्वराज्य रक्षक संभाजी चित्रपटातील हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारेज्येष्ठ चित्रपट अभिनेते राजन गवस, हंबीरराव  मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते, मृणालिनी मोहिते, कमांडर डॉक्टर राजकुमार पारे, सातारा, आणि डॉ. बी एन खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार कराड येथे प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सोलापूरची शांभवी जोशी सन्मानित*

शाहू नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या मराठी पाऊल पडते पुढे या महाराष्ट्र शासनाच्या अभियाना अंतर्गत संस्कृत लघु चित्रपटात बालकाराकाराची भूमिका केलेल्या शांभवी जोशी हिला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट अभिनेते जुळली गाठ ग या सण मराठी चैनल वरील मालिकेचे अभिनेते आणि निर्माते ,दिग्दर्शक संजय मोहिते आणि नाट्य अभिनेते भालचंद्र उसगावकर डॉ. बी एन खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.