सांगोला /प्रतिनिधी:
वाढेगाव येथे कृषी विज्ञान केंद्र मोहोळ व कृषी विभाग सांगोला यांच्या विद्यमानाने पीक प्रात्यक्षिक शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.स्वाती कदम विषय विशेषतज्ञ कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांनी मका, सूर्यफूल, पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. पंकज मडावी विषय विशेषतज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञानकेंद्र मोहोळ यांनी मका, ज्वारी, तूर या पिकाच्या मुख्य कीड व रोगाबाबत मार्गदर्शन केले. सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी महा कृषी विस्तार प तसेच कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी कृषि विभागाच्या ुुु.ारहरवल.षरीाशी.र्सेीं.ळप या संकेत स्थळावर अर्ज करण्याबाबत आवाहन केले.तसेच प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत ठिबक संचासाठी अनुसूचित जाती, जमातीतील शेतकरी बांधवानी अर्ज करण्याबात आवाहन केले.मंडळकृषी अधिकारी श्री भांगे, उप कृषी अधिकारी श्री चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी वाढेगाव उबाळे , सहाय्यक कृषी अधिकारी मनोज जाधव, वाढेगावच्या सरपंच कोमल डोईफोडे, उपसरपंच श्री शिवाजी दिघे, श्री वसंत दिघे गुरुजी, श्री दीपक दिघे ,श्री मच्छिंद्र पाटील ,श्री अप्पा इंगवले, व शेतकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा अनिल सिताराम दिघे यांच्या वस्तीवर घेण्यात आला.
