Breaking

Monday, 10 November 2025

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी कमरुद्दिन खतीब निवडणूक लढविणार

 नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागात उमेदवार उभा करण्याचा निर्णय: शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब

सांगोला /प्रतिनिधी:

 सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सांगोला शहरप्रमुख कमरुद्दिन खतीब हे स्वतः नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. तसेच शहरातील 11 प्रभागांमध्ये उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब यांनी दिली आहे .

सांगोला शहरातील विकासाचे मुद्दे घेऊन शिवसेना (उबाठा) पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दिन खतीब हे नगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असून नगरपालिकेच्या 11 प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय शिवसेना उबाठा पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार निश्‍चिती सुरू आहे.  शिवसेना पक्षाकडून कोणते उमेदवार उभे केले जाणार आहेत याची माहिती लवकरच दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे .