*चोपडी गावच्या हणमंत बाबर यांच्या शर्यतीच्या बैलांनी महाराष्ट्रभर केला चोपडी गावचा लौकिक
सांगोला/ प्रतिनिधी:
चोपडी तालुका सांगोला येथील हणमंत बाजीराव बाबर व सचिन बाजीराव बाबर यांच्या बैलगाडा शर्यतीच्या बैलांनी महाराष्ट्रामध्ये चोपडी गावचा नावलौकिक केला आहे. मणेराजुरी तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार सुभाष पाटील यांनी रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये विविध गटात बैलगाडा शर्यती घेण्यात आल्या. या बैलगाडा स्पर्धेमध्ये चोपडी येथील हणमंत बाजीराव बाबर यांच्या किंग बैज्या, किंग पिंट्या, वेग सम्राट शिल्या या शर्यतीच्या बैलांनी या स्पर्धेत दुसा व चौसा गटामध्ये 1 लाख50 हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले आहे. ब गटामध्ये प्रथम क्रमांकाचे 3 लाख रुपयांचे बक्षीस या बैलांनी जिंकले आहे.
आजपर्यंत वेगवेगळ्या मैदानावरती अनेक ठिकाणी या बैलांनी चोपडी गावचे नाव केले आहे. अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकाची बक्षीसे जिंकली आहेत. या बैलगाडा शर्यतीमध्ये हणमंत बाजीराव बाबर यांच्या बैलांनी या स्पर्धेमध्ये दोन गटात मिळून एकूण 4 लाख 50 हजार रुपयाची प्रथम क्रमांकाची 2 बक्षिसे जिंकून बैलगाडा शर्यतीत चोपडी गावचा एक नवीन इतिहास निर्माण केला आहे. या यशाबद्दल चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव, व जाणीव ग्रुप मित्रपरिवार ,चोपडी ग्रामस्थ, युवावर्ग यांनी हणमंत बाबर व सचिन बाबर या बैलमालकांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी हणमंत बाबर,अक्षय बाबर, कैलास बाबर, नवनाथ बाबर, समाधान बाबर, अमोल बाबर, सुभाष बाबर, सचिन मोहिते, विक्रम लाडे, राहुल पुकळे, बंडू रुपनर, सचिन कोकरे, विशाल सरगर, दिगंबर पुकळे यांनी विशेष परिश्रम घेत बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून चोपडी गावच्या नावलौकिकात भर टाकली आहे. या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून बैलांचे मालक हणमंत बाबर व सचिन बाबर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
