अजनाळे प्रतिनिधी
अजनाळे ग्रामपंचायतीकडून ग्रामविकास विभागाच्या 13 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. शासनाने निवासी घरपट्टी, दिवाबत्ती कर, आरोग्य कर आणि पाणीपट्टी यांसह सर्व प्रकारच्या थकित करांवर 50 टक्क्यांपर्यंत सवलतीचा निर्णय घेतला असून अजनाळे ग्रामपंचायतीने हा प्रस्ताव काल शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत एकमताने मंजूर केला.
ठराव मंजूर होताच कर्तव्यदक्ष सरपंच दिपाली लाडे व ग्रामविकास अधिकारी संदिप सरगर यांनी करसवलत योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली. या योजनेचा शुभारंभ पोलिस पाटील गोपाळ जाधव यांनी स्वतःचे विविध कर भरून केला. त्यांनी अर्ध्या रकमेच्या सवलतीचा लाभ घेत प्रथम लाभार्थी होण्याचा मान मिळवला.
अंमलबजावणीच्या कार्यक्रमाला सरपंच दिपाली लाडे, ग्रामविकास अधिकारी संदिप सरगर, डॉ. हेमंत चव्हाण, प्रशांत बनसोडे, महेश चव्हाण, गोरख येलपले, दादा गाडे, संजय बनसोडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. करसवलत योजनेमुळे ग्रामस्थांमध्ये दिलासा निर्माण झाला असून थकबाकीदार मोठ्या प्रमाणावर करभरणा करण्यास पुढे येत आहेत.
ग्रामपंचायतीच्या महसूल वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सवलत कालावधी हा 31 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. फोटो
अजनाळे ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी थकित कर बाकी वर 50 टक्के सवलतीचा निर्णय ग्रामसभेत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील जे थकबाकीदार आहेत त्यांनी आपल्याकडे असणारी थकबाकी भरून ग्रामपंचायत सहकार्य करून या सवलतीचा फायदा घ्यावा. ही सवलत फक्त एका महिन्यापर्यंत (31डिसेंबर 2025) मर्यादित आहे त्यामुळे जास्तीत जास्त खातेधारकांनी आपल्या कडील थकबाकीचा भरणा करण्यात यावा.
संदिप सरगर
ग्रामपंचायत अधिकारी अजनाळे
