सांगोला | प्रतिनिधी
प्रभाग 2 ब मधील अपक्ष उमेदवार दिपाली इंगोले यांचा शिवसेनेला जाहीर पाठींबा; वैशाली सावंत, प्रशांत धनवजीर व आनंदा माने यांच्या विजयासाठी कंबर कसली
सांगोला नगरपरिषद निवडणूक 2025 ला वेग आला असताना प्रभाग क. 2 ब मधील महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. प्रभाग 2 ब मधून अपक्ष उमेदवारी जाहीर करणाऱ्या सौ. दिपाली प्रविण इंगोले यांनी आज, दिनांक 28 नोव्हेंबर 2025, शिवसेनेला अधिकृत जाहीर पाठींबा दिला आहे.
दिपाली इंगोले यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे तसेच माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत पक्ष प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रभाग क.2 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
या उमेदवारांना दिला जाहीर पाठींबा
- नगराध्यक्ष पद : श्री. आनंदा गोरख माने
- प्रभाग 2 अ : श्री. प्रशांत धनवजीर
- प्रभाग 2 ब : सौ. वैशाली सतिश सावंत
दिपाली इंगोले यांनी जाहीर केले की, “दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला प्रचंड मतदान होण्यासाठी मी स्वतः पूर्ण ताकदीने काम करणार आहे.”
मतदारांना थेट आवाहन
सौ. दिपाली इंगोले यांनी प्रभाग क. 2 मधील सर्व मतदार बांधवांना आवाहन केले की—
“शिवसेनेचे अधिकृत उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हावर एकजुटीने मतदान करावे.”
या जाहीर पाठींब्यानंतर प्रभाग क.2 मधील राजकीय समीकरणांमध्ये नवीन कलाटणी आल्याचे बोलले जात असून शिवसेना पॅनेलला याचा थेट फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
