सांगोला/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पॅनलचे प्रभाग क्रमांक 2 अ चे उमेदवार प्रशांत बबन धनवजीर व प्रभाग क्रमांक 2 ब चे उमेदवार वैशाली सतीश सावंत या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील बिलेवस्ती, गायकवाडवस्ती, कोपटेवस्ती, जानकर वस्ती, बुरांडेवस्ती, भोकरेवस्ती यासह विविध भागात प्रचार करण्यात आलाप्रभाग क्रमांक दोन मध्ये 2016 च्या निवडणुकीत नगरसेवक सतीशभाऊ सावंत हे अपक्ष निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामामुळे सतीश सावंत यांना मतदारांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पत्नी वैशाली सतीश सावंत या सध्या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच दुसरे उमेदवार प्रशांत बबन धनवजीर यांनी यापूर्वी नगरसेवक व उपनगराध्यक्ष असताना केलेल्या विकास कामामुळे या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांना धनुष्य बाणाच्या चिन्हावर मतदान करून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने, प्रशांत धनवजीर व वैशाली सावंत यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी शिवसेना पॅनलला विजयी करण्याचे आवाहन उमेदवाराकडून करण्यात आले आहे.
