Breaking

Tuesday, 25 November 2025

सांगोला नगरपपरिषद निवडणूक 2025 : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 2 मध्ये होम-टू-होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 सांगोला नगरपपरिषद निवडणूक 2025 : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 2 मध्ये होम-टू-होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला / प्रतिनिधी:



सांगोला नगरपरिषद निवडणूक 2025  रंगतदार होऊ लागली असून शिवसेना पॅनलतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने, प्रभाग क्रमांक 2 अ चे उमेदवार प्रशांत बबन धनवजीर आणि प्रभाग क्रमांक 2 ब च्या उमेदवार वैशाली सतीश सावंत यांनी आज प्रभागातील घरारोघरी जाऊन  प्रचार केला.

हा प्रचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद — युवा–महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे  स्वागत केले. शिवसेना उमेदवारांच्या ‘धनुष्य-बाण’ चिन्हासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे चित्र दिसून आले.

या प्रचारात  तरुण आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

यामध्ये —

सुरेखा सावंत, रसिका सावंत, कोमल सावंत, सीमा इंगोले, पूजा शिंदे, साक्षी इंगोले, अविनाश सावंत, अक्षय सावंत, उमेश सावंत, विठ्ठल घुले, स्वप्निल सावंत, प्रसाद सावंत, सुमित सावंत, सौरभ इंगोले, दादा इंगोले, आशा गुडदौरू, आशा ठोकळे, श्वेता धनवजीर, सागर देशमुख आणि किरण साळुंखे — यांसारख्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उमेदवारांना साथ दिली.“शहर विकासासाठी शिवसेना पॅनल आवश्यक”असुन मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी सांगोला शहराच्या विकासासाठी शिवसेना पॅनल आवश्यक असल्याचे सांगितले.शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नवनवीन विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मतदारांनी धनुष्य-बाण चिन्हावर मतदान करून तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.शिवसेना पॅनलचा होम-टू-होम प्रचार प्रभाग 2 मध्ये उत्साहात सुरू असून कार्यकर्ते–मतदारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे या प्रभागात शिवसेनेची लाट असल्याचे  दिसू लागले आहे.