Breaking

Sunday, 5 October 2025

शिवसेना, भाजप आणि आरपीआय पक्षांची संयुक्त बैठक

 

सांगोला/प्रतिनिधी ः



आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक (2025) लक्षात घेता सांगोला शहरातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या तिन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक सोमवार, दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात, सांगोला येथे होणार आहे.

बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय, संघटनात्मक समन्वय आणि कार्यनीती आखणी यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.