सांगोला /प्रतिनिधी :
सांगोला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी स्वाती सतीश माने यांनी रसायनशास्त्र या विषयांमधून पीएच. डी. पदवी प्राप्त केली असल्याची माहिती सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांनी दिली.
श्री जगदीश प्रसाद झांबरमल टीबरेवाला युनिव्हर्सिटी, झुंझुनू (राजस्थान) या विद्यापीठातून रसायनशास्त्र या विभागातून भारतामध्ये सामान्यपणे वापरण्यात येणार्या चहा यांच्या अर्कांचे साधनात्मक विश्लेषण आणि अनुप्रयोग या विषयावर डॉ. स्वाती सतीश माने यांनी प्रबंध सादर केला होता. त्यांना सांगोला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्रा. डॉ. जी. एस. राशिनकर सर, प्रा. डॉ. निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ख-डढएच् रिसर्च संस्थेमार्फत उपलब्ध अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांच्या सुविधेच्या मदतीने चहा पावडर मधील रासायनिक घटकांचे विश्लेषण केले आहे.
डॉ. स्वाती सतीश माने यांनी पीएच. डी. प्राप्त केलेबदद्ल सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा. पी.सी.झपके, खजिनदार श्री. नागेश गुळमिरे, सचिव ड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे, सदस्य श्री.विश्वनाथ चव्हाण, महादेव झिरपे, श्री.सोमनाथ ढोले, श्री.रावसाहेब ताठे, डॉ.संजीवनी केळकर, श्री.शामराव लांडगे, श्री.सुरेश फुले, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांचेसह रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एस. पाटील प्रा. आर .ए. शिंदे, डॉ. बी. जी. पवार, डॉ. आर.जी. खानापुरे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बचुटे सर व श्री.प्रकाश शिंदे श्री.अनिल साखरे संगणक विभाग प्रमुख डॉ. आर आर ताठे, प्रा. सूर्यकांत पाटील, प्रा. अतुलकुमार शहा तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास माने सर, श्री बापू इंगोले, श्री तानाजी दिघे, श्री सतीश माने व प्राध्यापकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

