Breaking

Sunday, 5 October 2025

डॉ. विजय बंडगर यांच्याकडून वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील निराधारांना 55 किलो किराणा साहित्याचे वाटप


सांगोला/प्रतिनिधी ः



सांगोला शहरातील यशोदा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, प्रसिध्द स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. विजय बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन वृद्धाश्रमातील नागरिकांना भोजन व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. 

काल रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सांगोला शहरातील मातोश्री वृध्दाश्रमास भेट देवून तेथील सर्व निराधार, जेष्ठ  नागरिकांना भेट देवून भोजन आणि डॉ.विजय बंडगर यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त 55 किलो किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये  यामध्ये गहू ,तांदूळ, साखर, शेंगदाणे, कडधान्य,  गोडेतेल, साबण, बिस्किट असे जीवनाश्यक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. 

यावेळी प्रसिध्द स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ.विजय बंडगर यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना वयोवृध्दांनी आपल्या उतार वयामध्ये स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. पुढे बोलताना वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना भविष्यात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास मी सर्वोतपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 अशा स्वरूपाची मदत वाढदिवसानिमित्त निराधार व अनाथ लोकांना केल्यामुळे एक प्रकारची नवीन ऊर्जा व स्फूर्ती मिळते असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.महेश राऊत, वृद्धाश्रमाचे पालक जाधव यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शेवटी वृध्दाश्रमातील सर्व जेष्ठ, निराधार वयोवृद्धांनी डॉक्टर विजय बंडगर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व दीर्घायुष्य निरोगी लाभो असे आशीवा