सांगोला प्रतिनिधी -
गावात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत ग्रामस्थांनी कोणावर ही असा विश्वास ठेवु नका अशा घटना घडल्यामुळे गावाचे नाव बदनाम झाले आहे.गावातील नागरीकांनी अशा घटना पुढील काळात घडु नये या साठी सतर्क राहिले पाहीजे आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुक आहे निवडणुकीच्या काळामध्ये गावातील सर्वांनी निवडणूक प्रक्रिया शांतता अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी सांगोला पोलीस स्टेशन यांच्याकडून तुम्हाला सहकार्य निश्चितपणे केले जाईल असा विश्वास पोलिस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी व्यक्त केला.
काल रविवार दि 5 ऑक्टोंबर 2025 रोजी साय 7 वाजता पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी अजनाळे गावाला भेट दिली.
याप्रसंगी पोलिस सुजित जाधव, पोलीस पाटील संतोष भंडगे, विजय येलपले,बाळासो पुजारी,अमित शेंबडे, माणिक कोळवले, सुदर्शन वाघमारे, बालाजी धांडोरे, शिवाजी चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
पुढे बोलताना पोलिस उपनिरीक्षक रूपाली उबाळे म्हणाल्या की, गावामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी गावातील सर्व नागरीकांनी पक्ष पार्टी बाजूला ठेवून काम केले पाहिजे.अजनाळे गावात दोन मोठ्या घटना घडल्यामुळे गाव पोलीस स्टेशनच्या हिटलिस्टवर आहे नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना घडू नये म्हणून काळजी घ्यावी.नागरीकांनी काहि घटना घडत असतील तर त्या लवकरात लवकर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.गावाला पोलिस स्टेशनचे निश्चितपणे सहकार्य राहील. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन गावांमध्ये अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गावात ज्यावेळी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेस आम्हाला बोलवा पोलीस स्टेशन यांच्याकडून योग्य त्या सूचना देऊन ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी आपण प्रयत्न करुया. निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर तो पुढील काळामध्ये अडचण ठरू शकतो त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्था बिगडू देऊ नका जर कोणी या काळामध्ये जर बिघवडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी उबाळे यांनी दिला

