सांगोला /प्रतिनिधी:
हटकर मंगेवाडी तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील कै. प्रकाश भुसनर यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी व कुटुंबास मदत म्हणून पोलीस पाटील संघटनेकडून एक लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. बँक ऑफ इंडिया शाखा हातिद येथे एक लाख रुपयाची मुदत ठेव प्रकाश भुसनर यांच्या पत्नी शिवानी भुसनर यांच्या नावे मुदत ठेव ठेवण्यात आली आहे.
मुदत ठेवीचे प्रमाणपत्र पोलीस पाटील संघटनेकडून प्रकाश भुसनर यांच्या पत्नी शिवानी प्रकाश भूसनर यांना देण्यात आले .घरातील एखादा कर्ता माणूस कुटुंबातून निघून गेल्यानंतर त्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज असते. याच गोष्टीचा विचार करून सांगोला तालुका पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने व जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने असे एकत्रित एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. बँकेतील ठेवीचे प्रमाणपत्र सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

