कराड/प्रतिनिधी :
महिलांनी बचत गटाद्वारे छोट्या उद्योगातून स्वतःचे उत्पादन बाजारात आणून त्याचा ब्रॅण्ड बनवावा त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन गुंफण अकादमीचे अध्यक्ष पत्रकार ज्येष्ठ पत्रकार डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले.
डॉ. चेणगे हे चिखली (ता. कराड) येथे आजी माजी सैनिक संघटना, श्री दुर्गामाता महिला बचत गट, श्री सरस्वती माता महिला बचत गट व श्री भवानी माता महिला बचत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. चेणगे पुढे म्हणाले की, आज ग्रामीण भागात अनेक सुविधांचा अभाव असला तरी सर्वांनीच आपल्या भवितव्याविषयी सजग राहीले पाहीजे. युवकांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशभरात मिळेल त्या ठिकाणी जाऊन नोकरी, व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे.
या कार्यक्रमात डॉ. बसवेश्वर चेणगे यांना नुकताच सातारा भूषण पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बसवेश्वर चेणगे यांच्या हस्ते श्री. दुर्गामाता महिला बचत गट व श्री सरस्वती माता महिला बचत गट या दोन्ही बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यवसायाच्या मानधनाच्या चेकचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात चिखली गावातील ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेले नाईक विजय महादेव माळी, नाईक सुरज शिवाजी पवार, हवालदार आनंदराव प्रकाश पाटील, महाराष्ट्र शासनाच्या सी आर पी.एफ मध्ये निवड झाल्याबद्दल भरत फडणीस सावंत यांचा तसेच संघटनेला दोनशे झाडे वृक्षारोपना-साठी उपलब्ध करून दिल्याबददल अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांचा व राजाराम माळी यांची सुकन्या डॉ. पल्लवी माळी हिची आगाशिवनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाल्याबददल तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ-पल्लवी माळी यांनी महिलांचे आरोग्य, देखभाल, योगा, ब्लडप्रेशर प्रेशर, शुगर, कॅन्सर आदीबाबत माहिती दिली व आरोग्य जपण्याचे आवाहन केले. यावेळी सेवारत नाईक विजय माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात माजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सावंत यांनी महिला बचन गटाच्या उपक्रमांबददल माहिती दिली. तसेच त्यांनी माजी सैनिकांच्या समस्याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन केले. सैनिक कार्यालयाकडून मिळणार्या सुविधा, बचत गटांच्या बसेसची सद्यस्थिती, संघटनेच्या माध्यमातून केलेले प्रोजेक्ट याबाबत माहिती दिली. संघटनेचे माजी अध्यक्ष पांडुरंग माळी, या कार्यक्रमास, विजय सावंत सुरेश माळी, प्रकाश पाटील, महादेव गावडे, महादेव माळी यांच्यासह चिखली येथील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमराव बाबुराव सावंत यांनी केले. शेवटी राजाराम बाळू माळी योनी आभार मानले.

