Breaking

Tuesday, 7 October 2025

दिपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज कोळा च्या विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत यश

कोळा/प्रतिनिधी -



जिल्हा स्तरीय व राज्यस्तरीय खेळामध्ये नेहमीच दबदबा ठेवणार्‍या कोळा ता. सांगोला येथील दिपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज ची विद्यार्थीनी कु. साक्षी नाना धायगुडे हिने न्यू. इंग्लिश स्कूल करकंब येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय रोडरेस सायकलिंग स्पर्धेत 19 वर्षे वयोगटामधून प्रथम क्रमांक पटकावला असून साक्षी धायगुडे हिला क्रिडा शिक्षक प्रा. सुनिल माळी सर व प्रा. काशिलिंग व्हनमाने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनीचे पुणे येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साक्षी धायगुडे हिने मिळविलेल्या यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे संस्था अध्यक्ष दिपक माने, सचिव अमोल माने, मार्गदर्शक बाळासाहेब करांडे, संचालक शरद माने, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह कोळा ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.