Breaking

Saturday, 4 October 2025

अखेर कडलास ग्रामपंचायत सरपंच पदाचा अविश्‍वासाचा ठराव मा उच्च न्यायालय सर्किट बेंच यांनी कायम केला नवीन सरपंच पदाची निवडणूक 6 ऑक्टोबरला होणार

सांगोला/प्रतिनिधी 



सांगोला तालुक्यातील कडलास गावच्या इतिहासात पहिल्यांदाच अविश्‍वास ठरावाने तत्कालीन सरपंच दिगंबर भजनावळे यांना पद सोडावे लागले. 11 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या मतदानात 13 मते अविश्‍वासाच्या बाजूने तर केवळ 4 मते विरोधात पडली होती. त्यामुळे भजनावळे यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने जिल्हाधिकारी सोलापूर यांचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे सौ. सुनिता पांडुरंग भजनावळे यांच्या सरपंच पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.


2021 मध्ये सरपंच निवडीवेळी दिगंबर भजनावळे आणि सौ. सुनिता भजनावळे असे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र, सुनिता भजनावळे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने दिगंबर भजनावळे सरपंच झाले होते. त्यावेळी पवार गटाने अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला केला त्यामुळे सुनिता भजनावळे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेतला होता. परंतु अडीच वर्षानंतर सरपंच दिगंबर भजनावळे (सुनील पवार गटाने) शब्द न पाळल्याने व राजीनामा न दिल्याने दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सरपंच दिगंबर भजनावळे यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव आणून त्यांची सरपंच पदावरून पाय उतरणे केली दिगंबर भोजनावळे यांची नामुष्की झाल्याने त्यानंतर दिगंबर भजनावळे यांनी मा. कलेक्टर सोलापूर यांच्याकडे अविश्‍वास ठराव विरुद्ध अपील दाखल केली परंतु मा. कलेक्टर साहेबांनी अविश्‍वास ठराव कायम ठेवून अर्ज फेटाळण्यात आला होता त्यानंतर दिगंबर भजनावळे यांनी मा. उच्च न्यायालय सर्किट बँक कोल्हापूर यांच्याकडे रिपीटेशन दाखल केले होते सदरचे रिपिटेशन मा. उच्च न्यायालय यांनी दिनांक 3 /10/ 2025 रोजी फेटाळण्यात आले व अविश्‍वास ठराव कायम ठेवण्यात आला त्यामुळे सौ सुनीता भजनावळे यांचा सरपंच पदाचा मार्ग मोकळा होऊन सरपंच पदाची त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.  6 ऑक्टोबर रोजी विशेष सभेत नवीन सरपंच निवडीसाठी मतदान पार पडणार आहे. या सभेला एकूण 17 सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये -1) रुपाली प्रशांत साळुंखे2) दिपक रामचंद्र काशिद3) राहूल पांडुरंग गायकवाड4) जयश्री प्रकाश गायकवाड5) रेखा पांडुरंग काशिद6) सुनिता पांडुरंग भजनावळे7) मनीषा प्रकाश सातपुते8) मंगल सिद्राम लेडवे9) यशवंत चंद्रशेखर पवार10) शांताबाई आप्पासो जाधव11) विजय कृष्णा ननवरे12) सुमन दादासो अनुसे13) सीमा औदुंबर केदार14) बंडू दशरथ लवटे15) नितीन कृष्णा गव्हाणे16) ताईबाई भारत माने17) दिगंबर महादेव भजनावळे


या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया मा. मंडल अधिकारी जवळा हे निवडणूक अधिकारी म्हणून पार पाडणार आहेत.


 कडलास ग्रामपंचायतीतील सरपंच बदलाच्या या घडामोडीमुळे गावात चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे.