Breaking

Thursday, 9 October 2025

सांगोला पोलिसांची एकतपूर येथे जुगार अड्ड्यावर धाड - सात जणांना अटक, 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

 


सांगोला/प्रतिनिधी



सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी) दुपारी मौजे एकतपूर ते अचकदाणी रस्त्यावरील लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईतून 25 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल यश मधुकर देवकते (ब. क्र. 83, सोलापूर ग्रामीण) यांनी केली.

अटक आरोपी:

रणजित राजेंद्र घाडगे (25), लक्ष्मण सोपान फाळके (34), बंडु विठ्ठल नवले (55), सुभाष पांडुरंग नवले (65), धोंडीराम आण्णा फाळके (43), निलेश प्रेमकुमार उबाळे (26), मोहन शंकर वाघमारे (54), सर्व रा. एकतपूर, ता. सांगोला.

तसेच पंकज पोपट चव्हाण हा आरोपी फरार असून त्याचा विवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल:

विवो, मोटरोला, नोकीया आणि ओपो कंपनीचे मोबाईल, पत्त्यांचा संच आणि एकूण रोकड 25,060 रुपये किंमतीचा जुगार साहित्य असा माल हस्तगत करण्यात आला आहे.

घटनास्थळावर आरोपी रम्मी नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून मिळालेली रोकड आणि मोबाईल जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक 1020/2025 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईमुळे एकतपूर परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर धाक निर्माण झाला आहे. पुढील तपास सांगोला पोलिसांकडून सुरू आहे.