शास्त्रीय गायन, प्रश्न मंजुषा, निर्मिती चित्र, पाश्चात्य समुह गायन, हिंदी वक्तृत्व, मातीकाम, प्रहसन शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य गायन, रांगोळी, वादविवाद, पाश्चिमात्य वादन व लोकनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न
वाड:मय मंच (हिंदी वक्तृत्व स्पर्धा)
हिंदी वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांना आपले विचार भावना आणि कल्पना स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची संधी देणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा उपयोग विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य वाढवणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे संवाद कौशल्य व विचारांची मांडणी कशी करावी याबद्दलची तयारी ही विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेमार्फत होते. या स्पर्धेसाठी वसुदैव कुटूंबकम, सावध ऐका पुढच्या हाका, पाऊस पाऊस आणि पाऊस हे विषय देण्यात आले होते.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 32 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बबन गायकवाड, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. भाग्यश्री पाटील, श्री. राहुल ढोले व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.
ललित मंच (निर्मिती चित्र, मातीकाम, रांगोळी) -
निर्मितीचित्र स्पर्धेतील स्पर्धक हे परिसरातील टाकाऊ वस्तू किंवा बाहेरुन उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही साहीत्याचा वापर करुन, निर्मिती चित्र तयार करु शकतात. यामध्ये स्पर्धकाने बाजारपेठेत तयार असलेल्या कोणत्याही साधानांचा वापर करु शकत नाहीत. यातून विद्यार्थ्यांच्या मनातील संकल्पना ही प्रत्यक्षात मैदानावर उतरवली जाते. या स्पर्धेचे प्रमुख विषय महाराष्ट्राची संस्कृती व प्रगत भारत हे होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 24 संघानी सहभाग नोंदविला.
मातीकाम म्हणजेच मातीपासून तयार होणारी कला किंवा उपयोगी वस्तू तयार करण्याचे काम. हे एक पारंपरिक हस्तकला प्रकार आहे जो भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. मराठीत याला कुंभारकाम असंही म्हणतात. मातीकाम स्पर्धेसाठी प्रेम, शेतकरी आणि पशुपक्षी हे विषय होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 28 संघानी सहभाग नोंदविला.
रांगोळी स्पर्धेचे विषय हे संस्कृती, निसर्ग चित्र, ऑपरेशन सिंदूर हे होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 36 संघानी सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.व्ही एस जाधव, प्रा. सोनल भुंजे, प्रा. शंकर पाटील, प्रा. प्राप्ती लामगुंडे यांनी परिश्रम घेतले.
संगीत मंच (शास्त्रीय गायन स्पर्धा, शास्त्रीय तालवाद्य) -
शास्त्रीय गायन हे सुस्पष्ट नियमांवर आधारित किंवा परंपरागत शैलीत असते. भारतीय संगीत पद्धतीत दोन मुख्य शास्त्रीय खंड आहेत: हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (उत्तरेकडील शैली) आणि कर्नाटकीय शास्त्रीय संगीत (दक्षिण भारतातील शैली). शास्त्रीय गायनात राग व तान या संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राग म्हणजे स्वरांची विशिष्ट व्यवस्था, त्याची आरोह-अवरोह, त्याचे भाव, आणि तान हे ती विस्ताराने, अलापाने, गतीने गायले जाणारे स्वरसंग्रह आहेत. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 08 संघानी सहभाग नोंदविला.
शास्त्रीय तालवाद्य म्हणजे अशी वाद्ये जी वाजवताना मुख्यतःलय (ताल) तयार करतात. ही वाद्ये हाताने, बोटांनी किंवा कधी कधी लहान सोट्यांनी वाजवली जातात. शास्त्रीय संगीतात ही वाद्ये साथसंगतीसाठी वापरली जातात. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 13 संघानी सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महेश बडवे, प्रा.सुभाष पाटील, प्रा.आदर्श झपके, प्रा. सोनाली पाटील, प्रा. तेजस्विनी मिसाळ, श्री. महादेव काशिद व पवन माळी यांनी सहकार्य केले.
लोककला मंच (पाश्चात्य समुह व पाश्चिमात्य गायन स्पर्धा ) -
पाश्चात्य समूह गायन (पाश्चात्य शैलीतील) म्हणजे गायकांचा एक गट एकत्र येऊन सुरेलपणे गायन सादर करतो, ज्यात पाश्चात्य संगीतशैलीचे घटक असतात. हे गायन साधारणतः इंग्रजी किंवा इतर युरोपीय भाषांमध्ये केले जाते आणि त्यात हार्मनी, मेलोडी, रिदम यांना विशेष महत्त्व असते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 04 संघानी सहभाग नोंदविला.
पाश्चिमात्य गायन (पाश्चात्य शैलीतील) म्हणजे एका गायकाने येऊन सुरेलपणे गायन सादर करतो, ज्यात पाश्चात्य संगीतशैलीचे घटक असतात. हे गायन साधारणतः इंग्रजी किंवा इतर युरोपीय भाषांमध्ये केले जाते आणि त्यात हार्मनी, मेलोडी, रिदम यांना विशेष महत्त्व असते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 01 संघानी सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा सदाशिव शिंदे, डॉ. दिपक कवडे, प्रा कृष्णा पवार, प्रा शिवरत्न होनराव, प्रा संतोष लवटे, प्रा. अमोल कावळे, प्रा उदय पाटील, प्रा महेश घाडगे, प्रा शाहरुख मुलाणी,श्री शंकर माने व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.
मुख्यरंग मंच (प्रश्नमंजुषा तोंडी व प्रहसन स्पर्धा )
प्रश्नमंजुषा स्पर्धा ही सामान्य ज्ञानावर आधारीत लेखी व तोंडी अशा 02 प्रकारात असते. लेखी परीक्षा ही प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्राथमिक चाळणी परीक्षा आहे. या चाळणी परीक्षेमध्ये 37 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. या प्राथमिक चाळणीतून 05 संघाची निवड तोंडी परीक्षेसाठी करण्यात आली होती.
प्रहसन हा एक हास्यप्रधान नाट्यप्रकार आहे. यात मानवी जीवनातील विसंगती, दोष, विचित्र प्रसंग, दांभिकता, समाजातील चुकीच्या प्रवृत्ती इत्यादी गोष्टींवर उपहास, विनोद आणि विडंबनाच्या माध्यमातून टीका केली जाते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 24 संघानी सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विजयकुमार गाडेकर, प्रा. सिध्देश्वर कुलकर्णी, प्रा विशाल कुलकर्णी, प्रा.आशांक भोसले, प्रा. प्रज्ञा गायकवाड, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा कु पूनम हेटकळे, श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी, श्री. भाऊसो गायकवाड, श्री. सिध्देश्वर स्वामी, श्री. सत्यवान भोसले व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले. यावेळी युवा महोत्सवात वादविवाद, पाश्चिमात्य वादन व लोकनृत्य स्पर्धेचे सादरीकरण चालू होते.
