सांगोला प्रतिनिधी :
देशाचे सरन्यायाधीश मा.भूषण गवई साहेब यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र जाहीर निषेध सांगोला तालुक्यातून करण्यात येत आहे. या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील सर्व बहुजन बांधवांच्यावतीने शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सांगोला शहरातील दीक्षाभूमी कट्टा, भिमनगर येथू जाहीर निषेध मोर्चा निघणार असून या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता महात्मा फुले चौक, सांगोला येथून होणार असून, तेथून क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाला प्रारंभ होईल. मोर्चाच्या दरम्यान शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून, अखेर सांगोला तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यावर तहसीलदारांना निषेधाचे निवेदन सादर करून नीच कृत्य करणार्या मनुवादी विचारसरणीच्या इसमावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सर्व समाज घटक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी, तसेच विविध बहुजन संघटनांनी एकत्र येऊन न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असा नारा देत हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत.
आयोजकांनी सर्व सांगोला तालुक्यातील बहुजन बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान, न्याय आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
