Breaking

Thursday, 9 October 2025

पदवीधर- शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु: तहसीलदार संतोष कणसे

 

सांगोला/ प्रतिनिधी : 



पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सांगोला तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरीता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणूकीकरीता मतदार

नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरीता 1 नोहेंबर 2025 या अहर्ता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

 सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार संघाकरिता 10 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये सांगोला शहरामध्ये 4, संगेवाडी 1. महुद बुद्रुक 1. नाझरा 1,कोळा 1, हातीद 1. जवळा 1, मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत.  तर शिक्षक मतदार संघाकरीता  एकूण 7 मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहेत. त्यामध्ये सांगोला 1. संगेवाडी 1, नाझरा 1. महूद 1. कोळा 1. जवळा 1. हातीद1, अशी एकुण 17 मतदान केंद्र सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करणेत आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरीता फॉर्म नंबर 18 तर शिक्षक मतदार संघाकरीता फॉर्म नंबर 19 पात्र मतदार यांनी भरून द्यावयाचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून खालील अधिकारी यांची नियुक्ती करणेत आलेली.यांचेकडे मतदार यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरू द्यावयाचे आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी हीींिीं या लिंकचा वापर करावा. असे अवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे .

सांगोला: तहसीलदार संतोष कणसे, सांगोला: 

सांगोला चिंचोली. कमलापूर, गोडसेवाडी. वाढेगाव , राजापूर,वासूद, केदारवाडी, मेडशिंगी. बुरलेवाडी. आलेगाव, एखतपूर, वाकी शिवणे. नरळेवाडी. बागलवाडी. सोनलवाडी. अचकदाणी. लक्ष्मीनगर, गायगव्हाण. खिलारवाडी संगेवाडी : संतोष कणसे तहसिलदार सांगोला, संगेवाडी. शिरभावी, मेटकरवाडी. मांजरी. देवकतेवाडी, मेथवडे, धायटी, देवळे, हलदहिवडी, बामणी. सावे, महूद बु: उमेशचंद्र कुलकर्णी गट विकास अधिकारी पं. समिती सांगोला, महूद बु। महिम. कारंडेवाडी, कटफळ, इटकी. चिकमहूद. लोटेवाडी. खवासपूर, नवीलोटेवाडी हातीद: सुधीर गवळी मुख्याधिकारी न.प. सांगोला, हातीद. पाचेगाव खुर्द, मिसाळवाडी. नलवडेवाडी, जुजारपूर गुणापावाडी, उदनवाडी. झापाचीवाडी. कारंडेवाडी राजुरी, वाटंबरे. सोनंद, डोंगरगाव, गळवेवाडी. काशिदवाडी. मानेगाव, निजामपूर, लोणविरे, हण.मंतगाव, अकोला, कडलास. नाझरा: दिपाली जाधव तालुका कृषी अधिकारी सांगोला,: नाझरा. सरगरवाडी, वझरे, अनकढाळ, चिणके, अजनाळे. लिगाडेवाडी. यलमार मंगेवाडी. बलवडी जवळा : सोमनाथ साळुंखे निवासी नायब तहसिलदार: जवळा. बुरंगेवाडी. भोपसेवाडी. गळवेवाडी. तरंगेवाडी. पारे. हंगीरगे. गावडेवाडी. घेरडी. वाकी-घेरडी. वाणीचिंचाळे. डिकसळ, नराळे, हबिसेवाडी कोळा:. वसंत फुले सहा. गट विकास अधिकारी पं समिती सांगोला: कोळा. कोंबडवाडी, किडबिसरी. पाचेगाव बुः जुनोनी, काळूबाळूवाडी. बुद्धेहाळ, करांडेवाडी. गौडवाडी, चोपडी.बंडगरवाडी या गावांचा समावेश आहे तरी तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार यांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे.