Breaking

Wednesday, 3 June 2026

सूर्योदय परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन

 



सांगोला/प्रतिनिधी ः 




सांगोला आणि मंगळवेढा दोन तालुक्यातील सेवानिवृत्तांचा समावेश =8 प्रतिनिधी... अनेकविध प्रकारचे उद्योग आणि व्यवसायाबरोबरच वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये मोठ्या स्वरूपात रोजगार निर्मिती करणारा आणि त्याचबरोबर सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत वेळोवेळी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करणार्‍या सूर्योदय परिवाराच्या वतीने सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यामधील गेली वर्षभराच्या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी वृंदांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सूर्योदय बँक्वेट हॉल सांगोला येथे करण्यात आले असल्याची माहिती सूर्योदय ग्रुपचे संस्थापक आणि सूर्योदय अर्बन तसेच एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, सर्व रोग निदान शिबिरे, कृषी, कला ,क्रीडा ,धार्मिक व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रांमधून योगदान देत व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपणार्‍या सूर्योदय परिवाराने सातत्याने गुणीजनांचा आणि जेष्ठांचा सन्मान जपलेला आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजेच 1 जून 2025 ते 31 मे 2026 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, जूनियर व सीनियर कॉलेजचे प्राध्यापक, सैनिक, पोलीस, महसूल प्रशासन, विविध स्तरांवरचे अधिकारी त्याचबरोबर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यामध्ये शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्यांचे नुकतेच प्रमोशन झाले आहे असे नूतन मुख्याध्यापक किंवा तत्सम अन्य प्रमोटेड व्यक्ती यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार असल्याची माहितीही अनिलभाऊ इंगवले यांनी यावेळी दिली. लवकरच एका शानदार समारंभामध्ये या सर्व सेवानिवृत्तांना सन्मानित करण्यात येणार असून आपापले कार्यालयातील सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींची माहिती , नाव , संपर्क क्रमांक ,सेवा कालावधी आणि उल्लेखनीय कार्य याबाबतची अधिकृत माहिती लेटरहेडवर दिनांक सात जून 2026 पर्यंत सूर्योदय महिला अर्बन, महात्मा फुले चौक, सांगोला येथील कार्यालयात समक्ष आणून द्यावी. किंवा 9527061480/ 9763474959 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा असे आवाहन सूर्योदय परिवाराचे जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.