सांगोला/प्रतिनिधी ः
राज्याचे ईतर मागास बहुजन कल्याण विकास विभागाचे मंत्री ना.अतुलजी सावे यांच्याकडे सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी लोणारी समाजाच्या मागण्या संमंधीत मंत्री महोदयांना पत्राद्वारे महत्वपुर्ण मागण्या केल्या.
राज्यामध्ये अनेक विकास महामंडळे आहेत त्या पैकी लोणारी समाजाच्या अर्थीक विकासासाठी विष्णुपंत दादरे लोणारी अर्थीक विकास महामंडळ असुन.आशा महामंडळाच्या माध्यमातुन विविध प्रकारची कर्जे वितरीत केली जाणे अपेक्षेत आसताना लोणारी समाजातील युवक,महिला,व लघुउद्योजकांना मोठ्या प्रमाणात कर्ज मिळणे अपेक्षीत आहे.परंतु आँनलाईन अर्ज प्रणालीमध्ये लोणारी समाजाचे नाव व जात क्रमांक 183 उपलब्ध नसणे तसेच कर्ज योजनांमधील जाचक अटी व अपुरी कर्ज मर्यादा यांमुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांपासुन वंचित राहत आहेत तरी मंत्री महोदयांनी या बाबींकडे गांभिर्याने विचार करावा.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांना पत्राद्वारे कळविताना आनलाईन प्रणालीमधील लोणारी समाजाचे नाव जात क्रमांक 183 समावेशा बरोबर कर्जाची मर्यादा वाढवण्याची सुध्दा मागणी केली आहे.तसेच अल्प कर्जासाठी दोन जामीन दाराची अट शिथिल करावी व शासकीय सेवक व 8 वर्षे सेवा शिल्लक असलेल्या जामीनदाराची अट हटवावी तसेच ग्रामिण भागातील युवक, महिला व उद्योजकांना सुलभ निकषांवर कर्ज उपलब्ध करुन द्यावे आशा महत्वपुर्ण मागण्याचे निवेदन ईतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या कडेआज मुंबई येथे केली असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
