Breaking

Wednesday, 3 June 2026

पशुधन व्यवस्थापन व दूध उत्पादन पदविका विद्यालय, कडलास येथे जागतिक दूध दिन उत्साहात साजरा

 


सांगोला/प्रतिनिधी ः 

कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कै. रखमाई यशवंतराव गायकवाड मेमोरियल ट्रस्ट संचलित पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, कडलास येथे दिनांक 1 जून रोजी जागतिक दूध दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथील अधिष्ठाता डॉ. राजश्री पाटील व डॉ. अनिल पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले

विद्यालयाचे प्राचार्य मा डॉ शिवाजीराव भोसले व व्याख्याता सौ. वैशाली दबडे मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करताना दूध व दूधजन्य पदार्थांचे मानवाच्या जीवनातील महत्त्व सविस्तरपणे सांगितले. त्यांनी दूध हे संपूर्ण अन्न असून त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. नियमित दूध सेवनामुळे शरीराची वाढ, हाडांची मजबुती तसेच उत्तम आरोग्य राखण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच दूधापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप, पनीर आदी पदार्थांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी फायदे यांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने दूधाचे महत्त्व, पोषणमूल्ये तसेच दुग्ध व्यवसायाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांना दूधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.