नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे शिक्षक नेते व माजी मुख्याध्यापक अशोक अण्णाप्पा पाटील यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आज गुरुवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी सहा वाजता बाजार पटांगण नाझरे येथे आयोजन केले असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे राहतील.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतन सिंह केदार, डॉक्टर अनिकेत देशमुख, सांगोला सभापती सौ. पुनम ताई इंगवले, जत सभापती सौ. अर्चना पाटील, जि.प. पं. सदस्य, सरपंच, ग्राम. सदस्य, सर्वपक्षीय नेतेमंडळी, शिक्षक तसेच विविध स्तरातील मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत तरी ग्रामस्थांनी हजर राहावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
