उद्याच भरगच्च सामाजिक उपक्रमांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी :
लोकप्रिय युवा नेते दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्याच सोमवार दि.15 जून रोजी ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ साजरा करण्यात येणार असून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे मित्रपरिवार, सांगोला तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व शिवसेना पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाजवळ पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत यंदाही रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदतीचा हात मिळावा तसेच युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.
दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिक, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन दिपक उर्फ गुंडादादा मित्रपरिवार, सांगोला तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
अनाथाचा नाथ..लोकनाथ म्हणून सर्वत्र परिचित असणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,राज्यातील तरुणांचे आदर्श असलेले युवा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे नेते जनतेच्या मनातील पाणीदार आमदार ड.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते सोमवार दि.15 जून रोजी मा.आम.शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालया जवळ शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान महासंकल्प शिबिर साजरा होणार आहे सोबतच पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे या शिबिराला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सोहळा हितचिंतकांच्या शुभेच्छांचा ;अभिष्टचिंतन सोहळा.!
सोमवार दि.15 जून रोजी सांगोला तालुक्यातील तरुणांचा आदर्श असलेले तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ते मित्र परिवार व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात उपस्थित असतील अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
