Breaking

Thursday, 11 June 2026

रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ डॉ.विलास खांडेकर

 


महूद, ता. 10 : रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी येथील ज्येष्ठ डॉ.वि


लास खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.


रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार डॉ.विलास खांडेकर यांची

ही निवड करण्यात आली आहे.डॉ.विलास खांडेकर यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील 

 गेल्या अनेक दशकातील सातत्यपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दिली. डॉक्टर विलास खांडेकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचा उमेश पाटील, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर,माजी उपसरपंच दिलीप नागणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 



यावेळी डॉ.शरद नागणे,विजय खबाले,जितेंद्र इंगळे,दीपक धोकटे,प्रतीक ताटे,निलेश चव्हाण,उमेश महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, डॉ. विलास खांडेकर यांनी रुग्णसेवेबरोबरच शिक्षण क्षेत्रातही गेले अनेक दशके मोलाचे योगदान दिले आहे.महूद सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कष्टकर्‍यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध व्हाव्यात या भावनेने ते काम करत आहेत.होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणार्‍या डॉ. विलास खांडेकर यांची ही निवड अत्यंत सार्थ आहे.रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाच्या समन्वय समितीचे सदस्य म्हणून त्यांच्याकडून या पुढील काळातही उठावदार काम निश्‍चित होईल असेही ते म्हणाले.प्रतीक ताटे यांनी आभार मानले.