Breaking

Saturday, 13 June 2026

पंढरीत साहित्यिकांचा महाकुंभ! ’परिमल’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे दिमाखात वितरण*




*राज्यभरातील 31 साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव, ग्रामीण भागातील साहित्य चळवळीचे कौतुक*

पंढरपूर । प्रतिनिधी दिनांक 13 जून 2026

परिमल सांस्कृतिक व्यासपीठ रोपळे बुद्रुक तालुका पंढरपूर यांच्या वतीने गेल्या जाणार्‍या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे मोठ्या थाटात आणि दिमाखदार सोहळ्यात श्रीक्षेत्र पंढरी नगरीमध्ये वितरण करण्यात आले. राज्यभरातील 31 साहित्यिकांचा विविध श्रेणीतील साहित्य पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, प्रा. डॉ. शिवाजी शिंदे अध्यक्षस्थानी असलेल्या या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर शाखा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे उपस्थित होते तर युवा नेते प्रणव परिचारक आणि आदर्श माता पुष्पलता निकम, परिमाण संस्कृतीक बास्केट चे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रथम पनवेलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचा स्वागतपर सत्कार झाल्यानंतर उद्घाटक सिद्धार्थ ढवळे, प्रमुख पाहुणे प्रणव परिचारक आणि पुष्पलचा निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

मुख्य कार्यक्रमात विविध श्रेणीतील साहित्य पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यामध्ये 

मारुती कटकधोंड, (सोलापूर) यांच्या डोहतळ, रावसाहेब साठे (जत) यांच्या चुकारीची फुलं, बबन धुमाळ (दौंड) यांच्या नवा मोहर गळतो, वासंती वैद्य (पुणे) यांच्या आवर्त, हेमंत रत्नपारखी (मंगळवेढा) यांच्या हा खेळ नव्हे शब्दांचा या पुस्तकांना काव्य परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 

राजेंद्र भोसले (सोलापूर) यांच्या परतीचा प्रवास, मधुकर फरांडे (हातकणंगले) यांच्या कोंडी, अनिता जाधव (नांदेड) यांच्या तांड्याचे पाय, डॉ. मारुती नलावडे (ठाणे) यांच्या अहो खरंच 480 टक्के, डॉ. अनंत कडेठाणकर (छत्रपती संभाजी नगर) यांच्या लाईफ जॅकेट या पुस्तकांना कथा परिमल राज्यस्तरीय पुरस्कार 

ना. तु. पोघे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या इरवाड, सुनील देसाई (भुदरगड) यांच्या सप्तपर्व, सुजितकुमार कांबळे (मंगळवेढा) यांच्या यशबळी, प्रा.शिवाजीराव वाघमारे (पंढरपूर) यांच्या जडणघडण, दिनेश फडतरे (पुणे) यांच्या रँडम या पुस्तकांना साहित्य परिमल राज्यस्तरीय पुरस्कार

ह.भ.प. सूर्याजी भोसले (पंढरपूर) यांच्या कालाभूल, प्रा. नागेश सिंघण (पंढरपूर) यांच्या भाग्यविधाता, संतोष मंजुळे (करमाळा) यांच्या पार्वती, गंधार कुलकर्णी (अमरावती) यांच्या पद्यस्पर्श, संतोष रायबान (मंगळवेढा) यांच्या ओल काळजाची आणि मारुती वाघ (पुसेगाव) यांच्या कर्मचक्र पुस्तकांना उदय परिमल राज्यस्तरीय पुरस्कार

प्रकाश जडे (मंगळवेढा), प्रा.शशिकांत जाधव (मंगळवेढा), डॉ. विजयकुमार देशमुख (मुंबई), प्रा. दादासाहेब खरात (पंढरपूर), वंदना कुलकर्णी (सोलापूर), भारत सातपुते (लातूर), यांना सेवा परिमल पुरस्कार

प्रा .भास्कर बंगाळे (पंढरपूर) प्रा. शिवाजीराव बागल (पंढरपूर), जीवन पाटील (पंढरपूर) आणि प्रा.किसनराव कुराडे पाटील (कोल्हापूर) ज्येष्ठ साहित्यिकांना आयुष्यभरच्या साहित्य सेवेसाठी जीवन गौरव असणारा जीवन परिमल राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

असे कार्यक्रम लिहिणार्‍या हातांचे बळ वाढवतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या परिमल सांस्कृतिक व्यासपीठ च्या वतीने साहित्यिकांचा गौरव केला जात आहे. ही कौतुकाची बाब आहे. या संस्थेचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी अतिशय तळमळीने साहित्य सेवा करत आहेत हे पाहून आनंद तर वाटतोच परंतु त्यांमुळे साहित्य चळवळ जिवंत राहते याची खात्री वाटते असे प्रतिपादन सोहळ्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना त्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. 

या सोहळ्याचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन ड. उमाकांत आदमाने यांनी केले तर विश्‍व विक्रम वीर कवी रवी वसंत सोनार यांनी उपस्थित आमचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार तानाजी जाधव, विकास वळणे, मनीषा कुलकर्णी, प्रीती कुलकर्णी, मुरली शेटे, परिमल सांस्कृतिक व्यासपीठ चे सर्व पदाधिकारी, मित्र परिवाराने परिश्रम घेतले.