महूद, ता. 10 : विद्यार्थ्यांबरोबरच प्राथमिक शिक्षक समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत आहेत.या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी भविष्यातही समाजाच्या जडणघडणीसाठी वेळ द्यावा,असे विचार जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी व्यक्त केले.महूद येथील सहा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते
जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे व उमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महूद परिसरातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक शिवदास लोखंड होते. जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे व उमेश पाटील यांच्या हस्ते या सेवानिवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य उमेश पाटील,धनंजय नरळे,डॉ.शरद नागणे,ग्राम विकास अधिकारी जयवंत लवटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय महाजन आदींनी विचार व्यक्त केले.उमेश महाजन यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, पंचायत सदस्य उमेश पाटील, शिवदास लोखंडे,माजी उपसरपंच दिलीप नागणे, सुतगिरणीचे संचालक महेंद्र बाजारे, डॉक्टर शरद नागणे,विजय खबाले,निलेश नागणे, लक्ष्मण जाधव, रमाकांत तोडकरी, गणेश लवटे, विजय मरगर, यशवंत खबाले, जयवंत लवटे, संतोष नागणे, बाबुराव नागणे, धनंजय खांडेकर, संजय धोकटे, अरुण चव्हाण, अरुण नागणे, संतोष पवार यांचेसह महूद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा करण्यात आला कृतज्ञता सत्कार
संजय महाजन (मुख्याध्यापक,प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर), प्रकाश नष्टे(मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा बाबुळगाव ता. पंढरपूर), सलीम मुलाणी(उपशिक्षक, प्राथमिक शाळा ठेंगलवस्ती कटफळ), संपत आसबे(उपशिक्षक,विठ्ठलवाडी, महूद), भास्कर महाजन (उपशिक्षक, महानवरवस्ती ,चिकमहूद), सुधाकर डांगे (उपशिक्षक,प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर) या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला.
केदारनाथ यात्रा पूर्ण करणार्या कावड भक्तांचा सन्मान
या कार्यक्रमात महूद येथील कावड भक्तांचा सन्मान करण्यात आला. येथील 63 कावड भक्तांनी महूद ते केदारनाथ ही यात्रा यशस्वी पूर्ण केली. सुमारे 175 किलो वजनाची कावड खांद्यावर घेऊन अतिशय खडतर प्रवास करून त्यांनी केदारनाथाला जलाभिषेक घातला. या कावड भक्तांचे प्रतिनिधी बाबुराव नागणे व प्रतीक ताटे यांचाही या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
